🔰हिंदू मुलींचे अपहरण आणि धर्मातर थांबवण्यासाठी आपले सरकार ‘लव्ह जिहाद’ विरुद्ध कायदा करेल, असे गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी गुरुवारी एका निवडणूक प्रचार सभेत सांगितले.
🔰राज्य विधानसभेच्या आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनात याबाबतचे विधेयक मांडण्याच्या इराद्याचा रुपाणी यांनी पंचमहाल जिल्ह्य़ातील गोध्रा येथे पुनरुच्चार केला. ‘लव्ह जिहाद’ म्हणजे हिंदू महिलांचे विवाहाच्या माध्यमातून धर्मातर करण्याच्या कथित कारस्थानाविरोधात मध्य प्रदेश व उत्तर प्रदेशातील भाजप सरकारांनी यापूर्वी कायदे केले आहेत.
🔰‘विधानसभेचे अधिवेशन १ मार्चपासून सुरू होत असून, लव्ह जिहादच्या विरोधात कठोर कायदा करण्याची माझ्या सरकारची इच्छा आहे. हिंदू मुलींच्या अपहरणाचे प्रकार आम्ही खपवून घेणार नाही. महिलांना प्रलोभन दाखवून त्यांचे धर्मातर करण्यात येते. असे प्रकार थांबवणे हा या नव्या कायद्याचा उद्देश आहे’, असे रुपाणी म्हणाले.
🔰राज्यात २८ फेब्रुवारीला होत असलेल्या नगरपालिका, तालुका व जिल्हा पंचायत निवडणुकांसाठी रुपाणी सध्या प्रचार करत आहेत. राज्यातील भाजप सरकार अशा प्रकारचा कायदा करणार असल्याचे त्यांनी १५ फेब्रुवारीला सर्वप्रथम जाहीर केले होते. भाजपचे आमदार शैलेश मेहता व पक्षाचे बडोद्याच्या खासदार रंजनाबेन भट्ट यांनी यापूर्वी उत्तर प्रदेश व मध्य प्रदेशच्या धर्तीवर असा कायदा करण्याची मागणी केली होती.
No comments:
Post a Comment