Saturday, 6 February 2021

भारताचे नवीन अस्त्र -‘वॉरियर ड्रोन’.


🔰 भारताच्या पहिल्या सेमी-स्टेल्थ ड्रोनची प्रतिकृती बनवण्याचे काम सुरु आहे. बंगळुरुमध्ये पुढच्या आठवडयात होणाऱ्या मेगा एअर-शो मध्ये सेमी-स्टेल्थ ड्रोनचे मॉडेल प्रदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. ‘वॉरियर’ असे या ड्रोनचे नाव आहे. 


🔰 CATS किंवा कॉमबॅट एअर टीमिंग सिस्टिम या स्वदेशी कार्यक्रमातंर्गत हे ड्रोन विकसित करण्यात येत आहे. 


🔰 ‘वॉरियर’ ड्रोन हे मानव आणि मानवरहीत प्लॅटफॉर्मचं असं मिश्रण आहे, जे शत्रूचे हवाई सुरक्षा कवच भेदण्यास सक्षम आहे.


🔰 भारतीय बनावटीच्या ‘तेजस’ फायटर विमानासोबत संचालन करण्याच्या दृष्टीने ‘वॉरियर’ ड्रोन बनवण्यात येत आहे. युद्धभूमीमध्ये दोन्ही विमानं एकत्र असताना ‘वॉरियर’ ड्रोन ‘तेजस’चे रक्षणही करेल आणि शत्रूवर हल्लाही करेल, तीच वॉरियर ड्रोनच्या निर्मिती मागची संकल्पना आहे. 


🔰 पढच्या तीन ते पाच वर्षात ‘वॉरियर’ ड्रोनचे पहिले प्रोटोटाइप हवेत झेपावेल, अशी अपेक्षा आहे. एचएएलकडून यासाठी निधी उपलब्ध करुन दिला जात आहे.


🔰 परत्येक हवाई मोहिम यशस्वी करणे आणि वैमानिकाच्या जीवाला असणारा धोका कमी करणे, ही या वॉरियर ड्रोनच्या निर्मितीमागची कल्पना आहे. हवेतून हवेत आणि हवेतून जमिनीवर डागल्या जाणाऱ्या क्षेपणास्त्रांनी वॉरियर ड्रोन सुसज्ज असेल.


🔰 वॉरियर ड्रोन पूर्णपणे स्टेल्थ नाहीय. स्टेल्थ विमान रडारला चकवा देण्यास सक्षम असते. हे सेमी स्टेल्थ प्रकारातील विमान आहे. त्यामुळे सहजासहजी शत्रूच्या रडारला सापडणार नाही. युद्धात उपयोगी पडणारे ड्रोन विमान विकसित करण्यासाठी एचएएल मागच्या पाचवर्षापासून काम करत आहे. 


🔰 भारताकडे सध्या असलेल्या ड्रोन विमानांमधून टेहळणी करता येते. पण शत्रूच्या प्रदेशात हवाई हल्ला करु शकणारे ड्रोन विमान नाहीय. भारताने सध्या टेहळणी बरोबरच युद्ध लढू शकणाऱ्या ड्रोन तंत्रज्ञानावर भर दिला आहे.

No comments:

Post a Comment

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...