🔰पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 4 फेब्रुवारी 2021 रोजी उत्तरप्रदेशातील गोरखपूर शहरातल्या चौरी चौरा या ठिकाणी ‘चौरी चौरा’ शताब्दी समारंभाचे व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून उद्घाटन झाले.
🔰आजच्या दिवशी ‘चौरी चौरा’ घटनेला 100 वर्षे झाली आहेत, देशाच्या स्वातंत्र्याच्या लढाईतील ही ऐतिहासिक घटना आहे. याप्रसंगी चौरी चौरा शताब्दी कार्यक्रमाला समर्पित टपाल तिकीटही प्रकाशित केले गेले.
🔰उत्तरप्रदेश सरकारद्वारा आयोजित शताब्दी समारंभ आणि विविध कार्यक्रम राज्यातील सर्व 75 जिल्ह्यात 4 फेब्रुवारी 2021 पासून सुरू होतील आणि ते 4 फेब्रुवारी 2022 पर्यंत चालू राहतील.
🥏‘चौरी चौरा’ घटना.....
🔰महात्मा गांधीजींच्या नेतृत्वात चालविण्यात आलेल्या असहकार चळवळीला असस्मात थांबवण्यात आले होते. याला चौरी चौरा गावात चळवळीला मिळालेले हिंसक वळण हे कारण ठरले. 4 फेब्रुवारी 1922 रोजी पोलीसांनी जमावावर केलेल्या गोळीबाराने संतप्त होऊन आंदोलकांनी पोलीसांवर हल्ला केला व नंतर पोलीस ठाण्याला आग लावली. या हिंसक घटनेच्या पार्श्वभूमीवर गांधीजींनी चळवळ स्थगित केली.
No comments:
Post a Comment