Tuesday, 23 February 2021

कर्नाटकमध्ये द्वितीय ‘खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स’ खेळवले जातील.



🔰कर्नाटक राज्याच्या बेंगळुरु शहरात द्वितीय ‘खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स’ खेळवले जाण्याची घोषणा क्रिडा मंत्रालयाकडून करण्यात आली आहे.


🔴ठळक बाबी....


🔰कार्यक्रमाचे आयोजन ‘भारतीय विद्यापीठ संघ; यांच्या संयुक्त विद्यमाने होणार आहेत.


🔰25 वर्ष वयोगटाखालील 4,000 हून अधिक क्रिडापटू स्पर्धेत भाग घेणार आहेत, ज्यांची निवड राष्ट्रीय संघासाठी केली जाणार.खेळांच्या द्वितीय आवृत्तीत मल्लखांब आणि योगासन हे दोन नवीन क्रिडाप्रकार समाविष्ट करण्यात आले आहेत.


🔴‘खेलो इंडिया’ विषयी....


🔰एप्रिल 2016 मध्ये भारत सरकारने देशात क्रिडा क्षेत्राला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने ‘खेलो इंडिया’ या नवीन योजनेचा प्रारंभ केला. सुरुवातीच्या काळात या योजनेत मैदानी खेळ, वॉलीबॉल, कबड्डी, फुटबॉल, जूडो, हॉकी, बॉक्सिंग, टेबल टेनिस, बास्केट बॉल आणि कुस्ती या खेळांचा समावेश करण्यात आला होता आणि पुढे त्याची व्याप्ती इतर खेळांसाठी वाढविण्यात आली आहे.


🔰भारतीय क्रिडा शिष्यवृत्ती योजनेंतर्गत गुणवंत तरुण खेळाडूंची निवड करून त्यांना सलग 8 वर्षांसाठी प्रत्येकी 5 लक्ष रूपयांची वार्षिक शिष्यवृत्ती दिली जाते.


🔰ही स्पर्धा अगदी तळागळातील उत्कृष्ट खेळाडूंना समोर आणण्याच्या उद्देशाने आहे. यामध्ये उत्कृष्ट प्रदर्शन केलेल्यांना आंतरराष्ट्रीय पातळीवर उत्कृष्टता साध्य करण्यासाठी प्रोत्साहन दिले जाते.

No comments:

Post a Comment

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...