🔰मगळ ग्रह हा पृथ्वीचा सहोदर मानला जातो, म्हणजे जेव्हा सौरमालेची निर्मिती झाली तेव्हापासून या ग्रहाशी पृथ्वीचे जवळचे नाते आहे. पत्रिकेत जरी मंगळ त्रासदायक वाटत असला तरी तो लोभसवाणा आहे. या ग्रहावर पूर्वी सूक्ष्म जीव असावेत या शक्यतेतून तेथे सातत्याने शोध घेतला जात आहे.
🔰सभाव्य अवकाश थांब्यावर पहिला सेल्फी - सध्या संयुक्त अरब अमिरात (होप), चीन (तियानवेन १) यांची मंगळयाने मंगळाच्या कक्षेत आहेत, तर अमेरिकेच्या नासा व युरोपीय अवकाश संस्थेची परसिव्हिरन्स ही बग्गीसारखी गाडी तेथे उतरण्यात यशस्वी झाली आहे. ही आतापर्यंतची सर्वात मोठी गाडी आहे. मंगळ हा इतर ग्रहांवरील मोहिमांसाठी थांबा (स्टॉप) ठरू शकतो अशीही एक कल्पना आहे. मंगळावर मानवी वसाहतींची कल्पनाचित्रेही तयार आहेत.
🔰अमेरिकेसाठी रोव्हर गाडी मंगळावर उतरवणे हे फार अवघड काम नाही हे खरे असले तरी, ही सर्वात मोठी गाडी असून तिच्या मदतीने तेथील विवरातील खडक गोळा करून ते पृथ्वीवर आणले जाणार आहेत, हे या मोहिमेचे वैशिष्ट्य आहे. शिवाय त्यावरील कॅमेरे प्रथमच रंगीत छायाचित्रे घेत असून रोव्हर गाडीने मंगळावरचा सेल्फीही काढून पाठवला आहे.
No comments:
Post a Comment