Saturday, 20 February 2021

आसाममध्ये 'महाबाहु-ब्रह्मपुत्र’चा प्रारंभ.



🔰18 फेब्रुवारी 2021 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आसाममध्ये ‘महाबाहु-ब्रह्मपुत्र’ प्रकल्पाचा प्रारंभ केला.


🔰‘महाबाहु-ब्रह्मपुत्र’चा आरंभ प्रसंगी त्यांनी नेमाती-माजुली बेटे, उत्तर गुवाहाटी-दक्षिण गुवाहाटी आणि धुबरी-हातसिंगीमारी दरम्यानच्या रो-पॅक्स जहाज वाहतुकीचे उद्‌घाटन केले.


🔰आसाम आणि ईशान्येकडील अन्य भागात संपर्क हे मोठे आव्हान राहिले आहे. ‘महाबाहु-ब्रह्मपुत्रा’ कार्यक्रमाच्या माध्यमातून ब्रह्मपुत्रा नदीच्या पात्राद्वारे बंदर विकासातून जल संपर्क सुविधा मजबूत केली जाणार आहे. सुरू करण्यात आलेल्या तीन रो-पॅक्स सेवांमुळे इतक्या मोठ्या स्तरावर रो पॅक्स सेवेशी जोडले गेलेले आसाम राज्य देशातील अग्रणी राज्य झाले आहे. यामुळे चार पर्यटन जेट्टीसह आसामसह ईशान्येकडील संपर्क सुविधेत लक्षणीय सुधारणा होईल.


🔰माजुली ते नेमाटी दरम्यान रो-पॅक्स सेवा असा एक मार्ग आहे, ज्यामुळे रस्ते प्रवासाचे सुमारे 425 किमीचे अंतर कमी होऊन ते फक्त 12 किमीपर्यंत येईल. या मार्गावर दोन जहाजे चालविण्यात येत आहेत, जी एका वेळेला 1600 प्रवासी आणि डझनभर वाहनांची वाहतूक करतात.


🔰गवाहाटीमध्ये सुरू झालेली अशाच प्रकारची सुविधा उत्तर आणि दक्षिण गुवाहाटीमधील अंतर 40 किमीवरून 3 किमीपर्यंत कमी करेल.

No comments:

Post a Comment

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...