🔰2021-22 या आर्थिक वर्षासाठी अर्थसंकल्पीय भाषणात अर्थमंत्र्यांनी ‘शाश्वत विकासाचे ध्येय-6’ (SDG Goal-6) याच्याअंतर्गत जल जीवन मिशन (शहरी) योजना जाहीर केली.
🅾️ठळक बाबी
🔰जल जीवन मिशन (शहरी) योजना याची रचना सर्व 4378 वैधानिक छोट्या शहरांमधील सर्व घरांना क्रियाशील नळांद्वारे पाणी पुरवठा विस्तृतपणे सार्वत्रिक करण्यासाठी केली आहे.
🔰शहरी घरगुती नळ जोडणीमधील अंदाजे तफावत सुमारे दोन कोटी 68 लक्ष आहे, ज्यांचा जल जीवन मिशन अंतर्गत समावेश करण्याचा प्रस्ताव आहे.
🔰अभियान सांडपाण्याचा पुनर्वापर, जलसंपत्तीचे पुनरुज्जीवन आणि जलसंधारणावर लक्ष केंद्रित असेल.
🔰20 टक्के पाण्याची मागणी संस्थात्मक यंत्रणेच्या विकासासह पुनर्वापर केलेल्या पाण्याद्वारे पूर्ण करण्याचा प्रस्ताव आहे.
🔰अभियानासाठी प्रस्तावित एकूण खर्च 2 लक्ष 87 हजार कोटी रुपये एवढा आहे.
🔰अभियानाच्या अंतर्गत 4,378 शहरी स्थानिक मंडळ पाणी पुरवठा सुनिश्चित करण्यात येईल. 500 अमृत (AMRIT) शहरांमध्ये लिक्विड बेस्ड व्यवस्थापन करणे नियोजित आहे.
🔰योजनेत आगामी काही वर्षांत 3.60 लक्ष कोटी रुपये खर्च करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. 2019-20 मध्ये निर्मला सीतारमन यांनी घरापर्यंत नळ योजनेची घोषणा केली होती. ही योजना जल जीवन मिशनचा एक महत्त्वपूर्ण भाग आहे.
जल जीवन मिशन
🔰जल जीवन मिशनचा शुभारंभ 2019 साली करण्यात आला होता. केंद्र सरकार या मोहिमेच्या अंतर्गत देशातील सर्व भागात स्वच्छ पाणी पुरवठा करण्याचा उद्देश आहे.
🔰2024 सालापर्यंत सर्व घरांना नळाने पाणी देणे हे योजनेचे प्रमुख उद्दिष्ट आहे. योजनेमार्फत प्रत्येक कुटुंबाला नळाने पाणी पुरविणे, दरडोई 55 लिटर पाणीपुरवठा, शुद्ध पाणी देण्याचा संकल्प, सार्वजनिक नळाद्वारे कुटुंबांना पाणीपुरवठा ही योजनेची वैशिष्ट्ये आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा