Friday, 12 February 2021

भारतीय रेल्वेने सर्व विभागांमध्ये ‘मेरी सहेली’ उपक्रमाची अंमलबजावणी केली.



🔰महिलांना सुरक्षित प्रवास करता यावा यासाठी भारतीय रेल्वेने ‘मेरी सहेली’ हे अभियान सुरू केले आहे. त्याची आतापर्यंत भारतीय रेल्वेच्या सर्व विभागांमध्ये अंमलबजावणी झाली आहे. संपूर्ण प्रवासात महिलांना सुरक्षा प्रदान करणे हे या उपक्रमाचे उद्दिष्ट आहे.


🔴उपक्रमाविषयी....


🔰सप्टेंबर 2020 पासून दक्षिण पूर्व रेल्वे विभागाने सुरू केलेला हा महत्वाकांक्षी उपक्रम भारतीय रेल्वेच्या सर्व विभागांमध्ये 17 ऑक्टोबर 2020 पासून लागू करण्यात आला आहे.


🔰महिला प्रवाशांना त्यांच्या प्रवासादरम्यान सुरक्षा पुरविण्यासाठी रेल्वे सुरक्षा दलाच्यामार्फत (RPF) सुरू केलेले हे एक विशेष अभियान आहे.


🔰सरक्षा मदतक्रमांक (182) आणि GRP मदतक्रमांक (1512) याद्वारे महिलांना सुरक्षा पथकाशी संपर्कात राहता येते.


🔰‘मेरी सहेली’ ही महिला प्रवाशांची सतत सोबती म्हणून काम करते, जी त्यांची सुरक्षा केवळ सुरवातीच्या स्थानकापासून ते मार्गावरील स्थानकांवर, रेल्वे गाडीत आणि शेवटच्या स्थानकावर देखील करते. त्याच्या अंतर्गत महिला अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची विशेष पथके तयार केली आहेत. ही पथके महिला प्रवाशांसह सर्व डब्यांमध्ये जावून महिला प्रवाशांशी संवाद साधतात.


🔰रल्वे प्रवाशांचे नाव, PNR / तिकिट क्रमांक, कोच आणि बर्थ क्रमांक इत्यादी प्रवाशांचा तपशील देखील ‘मेरी सहेली’ पथक नोंदवते. हे तपशील मूळ स्थानक ते शेवटच्या स्थानकापर्यंत मार्गावरील इतर क्षेत्रांत, विभागांमध्ये सामायिक केले जातात.थांबलेल्या स्थानकांवर तैनात ‘मेरी सहेली’ पथक महिला प्रवाशांची सुरक्षा आणि आरोग्याबद्दल विचारपूस करते.

No comments:

Post a Comment