चंदीगड केंद्रशासित प्रदेशाच्या सरकारने व्यक्तीकडून होणाऱ्या कार्बन उत्सर्जनाचे मूल्यांकन करण्यासाठी एक यंत्रणा तयार केली आहे. असे करणारे ते भारतातील पहिले राज्य ठरले आहे.
▪️ठळक बाबी.
चंदीगड सरकारने ‘कार्बन वॉच’ नामक एक मोबाइल अॅप तयार केले आहे.
या अॅपच्या माध्यमातून चंडीगडच्या रहिवाशांना माहिती दिली जाणार आणि त्यांना कार्बन उत्सर्जनाबाबत जागरूक केले जाणार.
अॅप वेगवेगळ्या स्त्रोतांच्या वापराविषयी विस्तृत माहिती एकत्रित करतो आणि माहितीच्या आधारे कार्बन उत्सर्जनाची गणना करतो.
No comments:
Post a Comment