• माजी भारतीय परराष्ट्र सेवेचे अधिकारी अजय मल्होत्रा संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेच्या सल्लागार समितीचे अध्यक्ष म्हणून निवडले गेले आहेत.
• या पदावर निवड झालेले ते पहिले भारतीय आहेत.
• आपल्या सेवा कालावधीत त्यांनी बरीच महत्त्वाची पदे भूषवली आहेत. ते रशियामध्ये भारताचे उच्चायुक्त राहिले आहेत. त्यांनी केनियामधील नेरोबी इंडियन हाय कमिशनमध्येही काम केले आहे.
• नोव्हेंबर 2013 मधे ते परराष्ट्र सेवेतून सेवानिवृत्त झाले आहेत.
• केनिया आणि सेशल्ससारख्या देशांशी देशाचे संबंध दृढ करण्यासाठी अजय मल्होत्रा यांनी 1979 1982 to या काळात नैरोबीच्या उच्च आयोगातही काम केले आहे.
• 1985 मध्ये त्यांनी जिनिव्हा येथे संयुक्त राष्ट्राच्या स्थायी मिशनमध्ये सचिव म्हणूनही काम पाहिले. येथे त्यांनी 1989 पर्यंत सेवा बजावली.
• ILO मध्येही त्यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले आहे.
• संयुक्त राष्ट्राची मानवाधिकार सल्लागार समिती ही परिषदेची “थिंक टँक” म्हणून काम करते.
संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषद (UNHRC)
• संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषद, ही संस्था संयुक्त राष्ट्राचे एक अंग म्हणून एक आंतर-सरकारी संस्था म्हणून कार्यरत आहे.
• स्थापना - 2006 साली संयुक्त राष्ट्र मानवाधिकार आयोगाच्या जागी ही परिषद स्थापन केली गेली.
• उद्देश - विविध देशांमध्ये मानवी हक्कांना प्रोत्साहन देणे, त्यांचे संरक्षण करणे आणि उल्लंघन झाल्यास तोडगा काढणे हे या परिषदेचे उद्दीष्ट आहे.
• मुख्यालय - जिनिव्हा (स्वित्झर्लंड)
• सदस्य - 47, सदस्य भौगोलिक आधारावर तीन वर्षांच्या कालावधीसाठी निवडले जातात केले आणि जास्तीत जास्त दोन टर्म असतात.
• गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये पाकिस्तान पुन्हा यूएनएचआरसीचा सदस्य झाला असून आता तो 2023 पर्यंत सदस्य राहील तर 2021 पर्यंत भारत परिषदेचा सदस्य आहे.
• अलीकडेच फिजीचे राजदूत नाझत शमीम खान यांची संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेचे (यूएनएचआरसी) अध्यक्ष म्हणून निवड झाली आहे.
No comments:
Post a Comment