🔰सर्वोच्च न्यायालयाने रेल्वे विकास महामंडळाला मथुरा ते झाशीदरम्यान रेल्वे ट्रॅकचं काम करण्यासाठी चार हजार १०८ झाडं कापण्याची परवानगी दिली आहे. सरन्यायाधीश न्यायमूर्ती शरद बोबडे यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने ही परवानगी दिली आहे.
🔰विशेष म्हणजे जी झाडं पाडण्यासाठी न्यायलयाने परवानगी दिली आहे ती सर्व झाडं ताज ट्रॅपिझियम झोन (टीटीझेड) म्हणजेच संरक्षित क्षेत्रातील आहे. देशाचे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी रेल्वे विकास महामंडळाने या दोन स्थानकांना जोडणाऱ्या रेल्वे मार्गाचं काम करण्यासाठी परवानगी घेतल्याची माहिती न्यायालयाला दिली.
🔰ताज ट्रॅपिझियम झोन (टीटीझेड) हा १० हजार ४०० स्वेअर किलोमीटरचा परिसर आहे. अर्थात नावाप्रमाणे हा परिसर ताजमहालच्या आजूबाजूचा परिसर आहे. ताजमहाल ज्या ठिकाणी आहे तेथील प्रदुषण नियंत्रणात रहावे म्हणून या भागातील वन क्षेत्र संरक्षित करण्यात आलेलं आहे.
🔰सर्वोच्च न्यायालयाने टीटीझेडसंदर्भात उद्योग व्यवसायांना निर्देश देणारे आणि हे क्षेत्र संरक्षित करणारा आदेश ३० डिसेंबर १९९६ रोजी दिला होता. सर्वोच्च न्यायालयामध्ये ताजमहालच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये प्रदुषणाचे प्रमाण कमी करण्यासाठी दाखल करण्यात आलेल्या जनहितयाचिकेमध्ये हे क्षेत्र संरक्षित करण्याची मागणी करण्यात आलेली. ही मागणी मान्य करत न्यायालयाने या भागातील जमीन संरक्षित घोषित केलेली
No comments:
Post a Comment