०७ फेब्रुवारी २०२१

मलेरिया मोहिमेसाठी भारतीय वंशाचे डॉक्टर जागतिक समन्वयक


🔰अमेरिकेतील जो बायडेन प्रशासनाने डॉ. राज पंजाबी यांची नेमणूक मलेरिया नियंत्रण मोहिमेचे समन्वयक म्हणून केली असून ते भारतीय वंशाचे आहेत.


🔰आफ्रिका व आशियायी देशातून मलेरियाचे उच्चाटन करण्याचा उद्देश या मोहिमेत आहे. लायबेरियात जन्मलेले पंजाबी व त्यांचे कुटुंबीय तेथील यादवी युद्धानंतर अमेरिकेत पळून आले होते व १९९० मध्ये शरणार्थी म्हणून आयुष्य जगत होते. पंजाबी (वय ३९) यांनी ट्विटरवर म्हटले आहे की, आज सकाळी मलेरिया विरोधी मोहिमेच्या समन्वयकपदी शपथविधी झाला. बायडेन प्रशासनाने माझी जी नेमणूक केली त्याचा अभिमानाच वाटतो. या सेवेची संधी मिळाली याबद्दल मी ऋणी आहे. माझे कुटुंब व मी तीस वर्षांपूर्वी अमेरिकेत आलो.


🔰लायबेरियात त्यावेळी यादवी युद्ध सुरू होते. अमेरिकी समुदायाने त्यावेळी आमच्या कुटुंबाला आधार दिला त्यामुळे आमचे आयुष्य पूर्वपदावर आले. त्यामुळे या देशाची सेवा करण्यात आनंदच आहे. बायडेन-हॅरीस प्रशासनाने आपल्यावर जो विश्वास टाकला तो आपण सार्थ ठरवू. पंजाबी यांनी सांगितले की, अमेरिकेपुढे सध्या अनेक आव्हाने आहेत. त्यातून लवकर बाहेर पडणे गरजेचे आहे.


🔰माझे शिक्षण अमेरिकेत झाले असून परिस्थितीला आम्ही कधी शरण गेलो नाही तर तिचा स्वीकार करीत नवे भवितव्य घडवले. पंजाबी हे पेशाने डॉक्टर असून सार्वजनिक आरोग्य व्यावसायिक आहेत. मलेरिया निर्मूलनाच्या लक्ष्यात ते युनाटेड स्टेटस एजन्सी फॉर इंटरनॅशनल डेव्हलपमेंट व सेंटर फॉर डिसीज कंट्रोल या संस्थेच्या वतीने समन्वयाचे काम करतील.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Latest post

19 april महत्त्वपूर्ण चालू घडामोडी MCQ

१. कोणत्या राज्यात अलीकडेच उत्खननामुळे सर्वात उंच जैन मूर्ती धोक्यात आली ? अ. राजस्थान / राजस्थान बी. कर्नाटक C. मध्य प्रदेश D. तेलंगणा उत्त...