🔰रिअर ऍडमिरल एस. व्यंकटरमण, विशिष्ट सेवा पदक यांनी शुक्रवारी गोव्यात, भारतीय नौदलाच्या प्रतिष्ठित नौदल युद्ध महाविद्यालयाच्या प्रमुख म्हणून कार्यभार स्वीकारला. रिअर ऍडमिरल संजय जसजीत सिंह , अति विशिष्ट सेवा पदक,एनएम यांच्याकडून ऍडमिरल यांनी नौदलाच्या सर्वोच्च प्रशिक्षण संस्थेचा कार्यभार स्वीकारला.
🔰रणनितीक आणि कार्यात्मक विचारांच्या संस्कृतीला चालना देण्याच्या दृष्टीने,संरक्षण नियोजन, सामरिक आणि कार्यात्मक विषयांवर परदेशी सहभागींसह वरिष्ठ अधिकाऱ्यांसाठी हे नौदल युद्ध महाविद्यालय प्रशिक्षण आयोजित करते.
🔰रियर ऍडमिरल व्यंकटरमण हे राष्ट्रीय संरक्षण अकादमी खडकवासलाचे माजी विद्यार्थी आहेत. ते कम्युनिकेशन आणि इलेक्ट्रॉनिक्स युद्ध पद्धतीत तज्ञ आहेत.1 जानेवारी 1990 रोजी सेवेत रुजू झालेल्या व्यंकटरमण यांची भारतीय नौदलाच्या आघाडीच्या युद्धनौकांवर विविध ठिकाणी नियुक्ती झाली आहे.
🔰तयांच्या समुद्रातील कार्यकाळात आय एन एस तबार या विनाशिकेवर त्यांनी काम केले आहे. गोव्यात कार्यभार स्वीकारण्यापूर्वी ते नौदल मुख्यालयातील नौदल गुप्तहेर संचालनालयाचे प्रमुख होते.
🔰सरक्षण व्यवस्थापन महाविद्यालयातून व्यवस्थापन अभ्यासक्रमात संरक्षण आणि रणनितिक अभ्यासक्रमात पदव्युत्तर पदवीसह अनेक पदव्युत्तर अभ्यासक्रम कार्यक्रम त्यांनी पूर्ण केले आहेत.
No comments:
Post a Comment