Tuesday, 23 February 2021

राज्यांनी लसीकरणाचा वेग वाढवावा; केंद्र सरकारची सूचना



🔰महाराष्ट्रासह काही राज्यांत करोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढत असताना लसीकरणाचा वेग वाढवण्याच्या सूचना केंद्राने राज्यांना दिल्या असून अद्याप अनेक आरोग्य व आघाडीच्या कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली नसल्याचे म्हटले आहे.


🔰राज्यांच्या मुख्य सचिवांना पाठवलेल्या पत्रात  केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी म्हटले आहे की, आठवड्यातील लसीकरणाचे दिवस वाढवले पाहिजेत, किमान चार दिवस तरी लसीकरणाचे काम झाले पाहिजे तसेच त्यापुढील टप्प्यात पन्नाशीपुढील व्यक्तींचे लसीकरणही हाती घेण्याची गरज आहे. काही राज्यांनी आठवड्यातून दोन दिवस  लसीकरण सुरू ठेवले असून काही राज्यांत चार दिवस लसीकरणाचे काम केले जात आहे. कोविन सॉफ्टवेअरच्या माध्यमातून लसीकरणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असल्याचे पत्रात म्हटले आहे.


🔰१९  फेब्रुवारीच्या पत्रात म्हटले आहे की, आरोग्य व आघाडीच्या कर्मचाऱ्यांपैकी अनेकांना अजून लस मिळालेली नाही. त्यामुळे यात आठवड्यातील लसीकरणाचे दिवस वाढवण्याची गरज आहे. आतापर्यंत राज्ये व केंद्रशासित प्रदेशांच्या अनेक आढावा बैठका घेण्यात आल्या असून लसीकरण वाढवण्याची गरज त्यातून दिसून आली आहे. वयस्कर लोकांनाही तातडीने लस देणे सुरू करावे लागणार आहे.  मार्च २०२१ पासून सहआजार असलेल्या पन्नाशीवरील लोकांना लस देण्याचे काम सुरू करावे लागेल.


 🔰२१ फेब्रुवारीअखेर ११०८५१७३ लस मात्रा २३०८८८ सत्रात देण्यात आल्या असून त्यात ६३९१५४४ आरोग्य कर्मचाऱ्यांना पहिली मात्रा दिली आहे तर ९६०६४२ जणांना दुसरी मात्रा देण्यात आली आहे. आघाडीच्या कर्मचाऱ्यांत ३७३२९८७ जणांना लशीची पहिली मात्रा देण्यात आली आहे.

No comments:

Post a Comment

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...