Wednesday 10 February 2021

हिमाचल प्रदेश: ‘ई-मंत्रिमंडळ’ संकल्पना लागू करणारे पहिले राज्य



🔰हिमाचल प्रदेश हे ‘ई-मंत्रिमंडळ’ (किंवा ई-कॅबिनेट) याची अंमलबजावणी करणारे देशातले पहिले राज्य ठरले आहे आणि याचबरोबर राज्यातला सर्व मंत्रालयीन व्यवहार आता पूर्णपणे कागदरहित झालेला आहे.


🔴ठळक बाबी....


🔰राज्याच्या मंत्रिमंडळाच्या बैठकी घेण्यापासून ते मेमो/सूचना देण्यापर्यंतचे सर्व व्यवहार / कार्य प्रगत संगणकीय तंत्रज्ञानाच्या सहाय्याने पार पाडले जाणार आहेत.


🔰हिमाचल प्रदेश राज्य विधानसभा 2014 सालीच पूर्णपणे डिजिटल झाली होती.

राज्य सरकारच्या माहिती तंत्रज्ञान विभागाने ‘ई-मंत्रिमंडळ’ प्रकल्पासाठी मोबाइल अॅप देखील तयार केला आहे.


🔴हिमाचल प्रदेश राज्य...


🔰हिमाचल प्रदेश हे हिमालयाच्या कुशीतील एक भारतीय घटक राज्य आहे. त्याला 25 जानेवारी 1971 रोजी राज्याचा दर्जा प्राप्त झाला. त्याच्या उत्तरेस जम्मू व काश्मीर, पश्चिमेस पंजाब, नैर्ऋत्येस हरयाणा, दक्षिणेस उत्तर प्रदेश, आग्नेयीस उत्तरा-खंड ही राज्ये आणि पूर्वेस तिबेट हा चीनचा स्वायत्त विभाग आहे. सिमला (उर्फ शिमला) ही हिमाचल प्रदेशाची राजधानी आहे.


🔰सांप्रत हिमाचल प्रदेश राज्यात बिलासपूर, चंबा, हमीरपूर, कांग्रा, किन्नौर, कुलू, लाहूल व स्पिती, मंडी, सिमला, सिरमौर, सोलन व उना असे बारा जिल्हे आहेत. ते भारतीय संघराज्यातील एक घटकराज्य असल्यामुळे राष्ट्रपतींनी नेमलेल्या राज्यपालांच्या संमतीनुसार विधिमंडळाला जबाबदार असलेले मंत्रिमंडळ राज्यकारभार पाहते. राज्यात 68 सदस्यांचे एकसदनी विधिमंडळ असून लोकसभेवर राज्यातून 4 सदस्य व राज्यसभेवर 3 सदस्य निवडून दिले जातात.

No comments:

Post a Comment

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...