Saturday, 20 February 2021

‘गो इलेक्ट्रिक’: विजेवर चालणाऱ्या वाहन व उपकरणांच्या लाभाबाबत जागृती मोहीम



🔰19 फेब्रुवारी 2021 रोजी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते ‘गो इलेक्ट्रिक’ नामक एका मोहिमेचा प्रारंभ केला गेला. शिवाय ई-मोबिलिटी इको सिस्टीमचा विकास दर्शवणाऱ्या गो इलेक्ट्रिक मोहिमेच्या बोधचिन्हाचे अनावरण करण्यात आले.


🔰विजेवर चालणारी वाहने, अश्या वाहनांसाठी चार्जिंगची पायाभूत सुविधा आणि स्वयंपाकासाठी विजेवर चालणाऱ्या उपकरणांच्या लाभाबाबत जागृती करण्यासाठी ही मोहीम राबवण्यात येत आहे.


🅾️ठळक बाबी


🔰ऊर्जा मंत्रालयाच्या अंतर्गत असणाऱ्या एनर्जी इफिशियन्सी ब्युरोकडे (BEE) ही जागृती मोहीम राबवण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

आयातीचे 8 लक्ष कोटी रुपयांचा खर्च असलेल्या जीवाश्म इंधनासाठी ‘इलेक्ट्रिक वीज’ इंधन हा एक शाश्वत पर्याय आहे. पारंपरिक इंधनाशी तुलना करता वीज इंधन हे कमी खर्चिक, कार्बन उत्सर्जन कमी करणारे आणि स्वदेशी आहे.


🔰गो इलेक्ट्रिक मोहीम, येत्या काही वर्षात देशाचे आयातीवरचे अवलंबित्व कमी करण्यासाठी मदत करेल आणि स्वच्छ आणि हरित भविष्यासाठीही हे महत्वाचे पाऊल ठरेल.


🔰दशभरात जागृती निर्माण करण्यासाठी आणि इलेक्ट्रिक वाहन निर्मात्यांचा आत्मविश्वास वृद्धिगत करण्यासाठी ही मोहीम हाती घेण्यात आली आहे.

No comments:

Post a Comment