Wednesday, 10 February 2021

मराठा आरक्षणाची अंतिम सुनावणी ८ मार्चपासून



🔰मराठा आरक्षणप्रकरणी ८ ते १८ मार्च या दहा दिवसांमध्ये सर्वोच्च न्यायालयात अंतिम सुनावणी होईल. न्या. अशोक भूषण यांच्या पाचसदस्यीय पीठाच्या शुक्रवारी झालेल्या सुनावणीत न्यायालयाने निर्देश दिले.


🔰सर्वोच्च न्यायालयामध्ये दहा दिवसांत प्रत्यक्ष सुनावणी सुरू झाल्यास मराठा आरक्षणाच्या मुद्दय़ावरही प्रत्यक्ष सुनावणी होईल. अन्यथा दूरसंचार माध्यमातून सुनावणी घेतली जाईल. वादी व प्रतिवादी यांना युक्तिवादासाठी दिवस नेमून देण्यात आले असून केंद्र सरकारही बाजू मांडेल. 


🔰नया. भूषण यांच्या पीठासमोर २० जानेवारी रोजी झालेल्या सुनावणीत राज्य सरकारच्या वतीने प्रत्यक्ष सुनावणी घेण्याची विनंती करण्यात आली होती. त्यावर, ५ फेब्रुवारी रोजी नियमित सुनावणीची तारीख व सुनावणीचे स्वरूप निश्चित केले जाईल असे न्यायालयाने स्पष्ट केले होते. सर्वोच्च न्यायालयाच्या तीनसदस्यीय पीठाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिली असून राज्य सरकार व या प्रकरणी हस्तक्षेप करत याचिकाकर्त्यांनी हे प्रकरण पाच वा मोठय़ा पीठाकडे देण्याची विनंती केली होती.

No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...