Saturday, 6 February 2021

जागतिक कर्करोग दिन: 4 फेब्रुवारी


🔰दरवर्षी 4 फेब्रुवारी या दिवशी जगभरात ‘जागतिक कर्करोग दिन’ जागतिक आरोग्य संस्था (WHO) आणि आंतरराष्ट्रीय कर्करोग नियंत्रण संघ (UICC) या संस्थांच्या नेतृत्वात पाळला जातो.


🔰सन 2019, सन 2020, सन 2021 या तीन वर्षांसाठी 'आय एम अँड आय वील' या संकल्पनेखाली एक जागतिक मोहीम चालवली जात आहे. याबाबत जगभरात कर्करोगाविषयी जनजागृती फैलावण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे.


🔴कर्करोग.....


🔰कर्करोग हा असा आजार आहे, ज्यामध्ये जेव्हा शरीरातल्या सामान्य पेशींच्या गटामध्ये बदल होतो तेव्हा त्या पेशींची अनियंत्रित, असामान्य वाढ होते आणि शरीरात गाठी तयार होतात. ल्युकेमिया (रक्ताचा कर्करोग) वगळता इतर सर्व कर्करोगाबाबत हे सत्य आहे.


🔰कर्करोगामुळे पेशी अनियंत्रितपणे विभाजित होतात. त्यामुळे गाठी (ट्यूमर) तयार होतात, रोगप्रतिकारक शक्ती कमी होते आणि इतर दुर्बलता देखील येऊ शकतात जी प्राणघातक असू शकते.


🔴कर्करोगासंबंधी जागतिक दृष्य.....


🔰दरवर्षी जगभरात जवळपास 9.6 दशलक्ष लोकांचा कर्करोगाने मृत्यू होतो.

सामान्य कर्करोगांमध्ये आढळून येणारे किमान एक तृतीयांश प्रकार प्रतिबंधित केले जाऊ शकते.कर्करोग हा जगभरात होणार्‍या मृत्यूसाठी दुसरा अग्रगण्य कारक आहे.70 टक्के कर्करोगासंबंधी मृत्यू कमी-ते-मध्यम उत्पन्न असलेल्या देशांमध्ये होतात.कर्करोगाचा एकूण वार्षिक आर्थिक खर्च अंदाजे 1.16 लक्ष कोटी (ट्रिलियन) डॉलर एवढा आहे.


🔰कर्करोगाशी लढण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर आंतरराष्ट्रीय कर्करोग नियंत्रण संघ (UICC) ही संस्था निरंतर कार्यरत आहे. त्यांच्या सूचनेनुसार, सर्वप्रकारच्या कर्करोगामध्ये सुमारे एक तृतीयांश प्रकार आपल्या जीवनशैलीमध्ये बदल करून अधिकाधिक शारीरिक कामे करून आणि बैठे काम कमीतकमी करून रोखले जाऊ शकतात. मोठ्या संख्येने असेही दिसून आले आहे की उपचारादरम्यान किंवा त्यानंतर व्यायामामुळे चांगले परिणाम दिसून येतात.


🔴दिनाचा इतिहास.....


🔰4 फेब्रुवारी 2000 रोजी पॅरिस (फ्रान्स) येथे झालेल्या ‘वर्ल्ड कॅन्सर समिट अगेन्स्ट कॅन्सर फॉर द न्यू मिलेनियम’ या कार्यक्रमात ‘मुस्तफा जागतिक कर्करोग दिन’ची स्थापना केली गेली. तेव्हापासून हा दिन 4 फेब्रुवारीला साजरा करतात.


🔰जागतिक कर्करोग दिन दरवर्षी 4 फेब्रुवारीला कर्करोगाबद्दल जागरुकता वाढविण्याकरिता आणि प्रतिबंध, शोध आणि उपचारांना प्रोत्साहन देण्याकरिता आयोजित केला जातो. हा दिन आंतरराष्ट्रीय कर्करोग नियंत्रण संघ (UICC) यांनी वर्ष 2008 मध्ये लिहिलेल्या ‘जागतिक कर्करोग घोषणापत्र’चे समर्थन करण्यासंदर्भात पाळला जातो.


🔴आतरराष्ट्रीय कर्करोग नियंत्रण संघ (UICC)....


🔰आतरराष्ट्रीय कर्करोग नियंत्रण संघ (Union for International Cancer Control -UICC) ही कर्करोगाविरुद्धच्या लढ्यातील सर्वात मोठी आणि जगभरात जवळपास 155 देशांमध्ये 800 हून अधिक सदस्य संस्थांची एक आंतरराष्ट्रीय संघटना आहे. 1933 साली या संघटनेची स्थापना झाली आणि त्याचे मुख्यालय जिनेव्हा (स्वित्झर्लंड) येथे आहे.


🔰ही संघटना जागतिक आरोग्य आणि विकास उद्दिष्टे यामध्ये जागतिक कर्करोगाचा भार कमी करण्यासाठी, अधिकाधीक समानतेला प्रोत्साहन देण्यासाठी आणि कर्करोग नियंत्रण एकाग्रीत करण्यासाठी कर्करोग समुदायांना एकत्र आणण्यासाठी क्षमता बांधणी करण्यासाठी आणि पुढाकारामध्ये आघाडी घेण्यासाठी समर्पित आहे. UICC आणि त्याचे बहू-क्षेत्रातील भागीदार हे जगातील सरकारांना यादृष्टीने गुणवत्तापूर्ण आणि शाश्वत कार्यक्रम चालवण्यासाठी उत्तेजन देण्यास बांधील आहेत.

No comments:

Post a Comment

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...