Friday, 26 February 2021

पतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली ‘प्रगती’ ही 36 वी पायाभूत सुविधाविषयक बैठक संपन्न.


 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज ‘प्रगती’ बैठकीचे 36 वे सत्र संपन्न झाले.


बैठकीत, आठ प्रकल्प, एक योजना व एका कार्यक्रमासंदर्भातील तक्रारी यासह दहा विषयांचा आढावा घेण्यात आला. 


आठ प्रकल्पांपैकी तीन प्रकल्प रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाचे, दोन रेल्वे मंत्रालयाचे, प्रत्येकी एक ऊर्जा मंत्रालय, पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्रालय आणि गृह मंत्रालयाचे होते. या आठ प्रकल्पांची एकूण किंमत 44,545 कोटी रुपये असून हे प्रकल्प पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू, ओदिशा, झारखंड, सिक्कीम, उत्तरप्रदेश, मिझोराम, गुजरात, मध्यप्रदेश, बिहार आणि मेघालय  या राज्यांशी संबंधित आहेत.


पंतप्रधानांनी यावेळी काही प्रकल्पांच्या अंमलबजावणीमध्ये होणाऱ्या विलंबाबाबत  चिंता व्यक्त केली आणि संबंधित अधिकाऱ्यांना सर्व प्रलंबित प्रश्न त्वरित निकाली काढण्याचे निर्देश दिले.बैठकी दरम्यान पंतप्रधानांनी सिंगल यूज प्लास्टिक निर्मूलनाच्या कार्यक्रमाचा आढावा घेतला. 


तसेच पंतप्रधान ग्राम सडक योजनेशी संबंधित तक्रारींचा आढावाही घेण्यात आला. योग्य जागरूकता मोहिमेद्वारे लोकांना आणि विशेषत: तरुणांना सहभागी करून घेण्याच्या आवश्यकतेवर  पंतप्रधानांनी जोर दिला. 


पंतप्रधान ग्राम सडक योजने अंतर्गत बांधल्या जाणाऱ्या रस्त्यांच्या गुणवत्तेकडे विशेष लक्ष देण्याचे आवाहन त्यांनी सर्व अधिकाऱ्यांना केले.प्रगती बैठकीच्या 35 व्या सत्रापर्यंत एकूण 13.60 लाख कोटी रुपये खर्चाच्या 290 प्रकल्पांचा आढावा घेण्यात आला आहे. 

No comments:

Post a Comment

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...