१३ फेब्रुवारी २०२१

विज्ञान क्षेत्रात स्त्रिया आणि मुली यांचा आंतरराष्ट्रीय दिन: 11 फेब्रुवारी.



🔰दरवर्षी 11 फेब्रुवारी या दिवशी जगभरात ‘विज्ञान क्षेत्रात स्त्रिया आणि मुली यांचा आंतरराष्ट्रीय दिन’ साजरा करतात.


🔰2021 साली ‘विज्ञान क्षेत्रात स्त्रिया आणि मुली यांचा आंतरराष्ट्रीय दिन’ “विमेन सायंटिस्ट्स अॅट द फोरफ्रंट ऑफ द फाइट अगेन्स्ट कोविड-19” या संकल्पनेखाली पाळला गेला आहे.


🔰यदा या आंतरराष्ट्रीय दिनाच्या निमित्ताने, विज्ञान, तंत्रज्ञान, इलेक्ट्रॉनिक्स आणि गणित (STEM) या क्षेत्रात स्वतःचे वेगळे स्थान निर्माण करणाऱ्या महिलांचा सन्मान करण्यासाठी, तसेच या क्षेत्रात प्रावीण्य मिळवण्याची आणि राष्ट्रउभारणीत योगदान देण्याची महत्त्वाकांक्षा बाळगणाऱ्या युवतींना प्रोत्साहन देण्यासाठी महिला आणि बालविकास मंत्रालयाने शिक्षण मंत्रालय आणि माय जीओव्ही, इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालय यांच्या सहकार्याने एक ऑनलाईन मोहीम सुरू केली.


🔰गणित आणि विज्ञान या विषयात देशभरात ज्या मुलींनी उत्तम कामगिरी केली आहे त्यांचा सन्मान या मोहिमेद्वारे करण्यात येत आहे आणि भावी काळात आपल्याला अभिमान वाटेल अशी कामगिरी करण्यासाठी त्यांना प्रोत्साहन देण्यात येत आहे.


🔴पार्श्वभूमी..


🔰22 डिसेंबर 2015 रोजी संयुक्‍त राष्ट्रसंघ महासभेत दरवर्षी 11 फेब्रुवारी या दिवशी जगभरात ‘विज्ञान क्षेत्रात स्त्रिया आणि मुली यांचा आंतरराष्ट्रीय दिन’ साजरा करण्याची घोषणा करणारा एक ठराव मंजूर करण्यात आला होता.


🔰या दिवशी विज्ञान क्षेत्रात स्त्रिया आणि मुलींचा सहभाग वाढवा या उद्देशाने अधिकाधिक प्रोत्साहन देऊन त्याबाबत जनजागृती केली जाते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Latest post

ठळक बातम्या.१५ एप्रिल २०२५.

१. भारत - हवाई लक्ष्यांवर हल्ला करून ते नष्ट करू शकणाऱ्या उच्च-ऊर्जा लेसर-निर्देशित (DEA) शस्त्र प्रणालीची यशस्वी चाचणी घेणारा भारत जगातील च...