मोबाइल इंटरनेट स्पीड आणि फिक्स्ड ब्रॉडबँड स्पीडच्या बाबतीत भारताच्या रँकिंगमध्ये एका स्थानाची घसरण झालीये. मोबाइल इंटरनेट स्पीडमध्ये भारत 129 व्या स्थानावर आहे, तर फिक्स्ड ब्रॉडबँड स्पीडमध्ये भारताचा 65 क्रमांक आहे. तर, मुस्लिम बहुल देश कतारने मोबाइल इंटरनेट स्पीडमध्ये दोन स्थानांची झेप घेतलीये. त्यामुळे साउथ कोरिया आणि संयुक्त अरब अमिरातला मागे टाकून कतार जगातील सर्वात जास्त मोबाइल इंटरनेट स्पीड असलेला देश ठरलाय. तर, थायलंड फिक्स्ड ब्रॉडबँड स्पीडमध्ये जगात अव्वल ठरलाय.
▪️भारतातला सरासरी मोबाइल इंटरनेट स्पीड :-
स्पीड टेस्ड ग्लोबल इंडेक्स Ookla च्या रिपोर्टनुसार, भारताच्या मोबाइल इंटरनेट डाउनलोड स्पीडमध्ये गेल्या नोव्हेंबर महिन्याच्या 13.51Mbps स्पीडच्या तुलनेत डिसेंबर महिन्यात 4.4 टक्के घट झाली आणि 12.91Mbps इतका भारताचा स्पीड नोंदवण्यात आला. तर याच महिन्यात भारताच्या सरासरी अपलोड स्पीड मात्र 1.4 टक्क्यांनी वाढलाय. यामुळे अपलोड स्पीड 4.90Mbps वरुन वाढून 4.97Mbps झाला आहे.
177.52Mbps स्पीडसह कतार अव्वल :-
कतारमध्ये मोबाइल डाउनलोडिंग स्पीड सर्वाधिक 178.01Mbps नोंदवण्यात आला. कतारनंतर 177.52Mbps स्पीडसह UAE चा नंबर लागतो. या लिस्टमध्ये साउथ कोरिया तिसऱ्या, चीन चौथ्या आणि ऑस्ट्रेलिया पाचव्या क्रमांकावर आहे.
▪️फिक्स्ड ब्रॉडबँड स्पीडमध्ये भारताचा 65 वा क्रमांक :-
तर, फिक्स्ड ब्रॉडबँड स्पीडमध्ये भारताचा सरासरी डाउनलोडिंग स्पीड 53.90Mbps नोंदवण्यात आला. या क्रमवारीत भारताचा 65 वा नंबर लागतो. डिसेंबर महिन्यातील भारताचा फिक्स्ड ब्रॉडबँड अपलोड स्पीड 50.75Mbps होता, तर नोव्हेंबरमध्ये 52.02Mbps इतका होता. थायलंड फिक्स्ड ब्रॉडबँड स्पीडच्या बाबतीत अव्वल ठरला. थायलंडचा सरासरी डाउनलोडिंग स्पीड 308.35Mbps होता. थायलंडनंतर अनुक्रमे सिंगापूर आणि हाँगकाँगचा क्रमांक आहे. तर, रोमानिया चौथ्या आणि स्विझर्लंड पाचव्या स्थानी आहे. जगाचा विचार केल्यास जागतिक सरासरी फिक्स्ड ब्रॉडबँड स्पीड डिसेंबर महिन्यात 96.43Mbps होता, तर नोव्हेंबरमध्ये 91.96Mbps इतका होता. तर, अपलोडिंग ब्रॉडबँड स्पीड 49.44mbps वरुन 53.31Mbps झाला.
No comments:
Post a Comment