१) रंग आंधळेपणा (Colour Blindness):
अनुवांशिक व बरा न होणारा रोगसर्व रंग दिसतात. मात्र, त्यातील फरक जाणवून येत नाही. विशेषतः लाल व हिरवा रंगातील फरक समजून येत नाही . फक्त पुरुषांनाच होतो.
२) मोतीबिंदू (Cataract)
डोळ्यातील प्रथिनांच्या रंगातील बदलामुळे नेत्रभिंग धूसर किंवा अस्पष्ट बनतो, कमी प्रकाशात चांगले तर जास्त प्रकाशात कमी दिसते. उपाय: भिंगारोपण, बहिरवर्क भिंगाचे रोपण केले जाते. मोतीबिंदूची शस्त्रक्रिया झाल्यावर कधी कधी नवीन बसविलेल्या भिंगाच्या मागे पुन्हा मोतीबिंदू तयार होते. यासाठी काही महिने ते काही वर्षे असा कालावधी असू शकतो. YAG लेसर वापरून हा द्वितीयक मोतीबिंदू काढता येतो.
३) काचबिंदू (Glaucoma):
हि व्यथा वयाच्या ४० ते ५० वर्षाच्या दरम्यान होते. नेत्रजलाच्या निचऱ्यामध्ये बिघाड झाल्यास ते डोळ्यात साठू लागते. त्यामुळे डोळ्याच्या आतील दाब (अंतर्दाब) वाजवीपेक्षा जास्त वाढतो व डोळा टणक बनतो. त्यामुळे बुबुळ घासले गेल्याने काचेसारखे चकचकीत होते. म्हणून त्याला काचबिंदू असे म्हणतात. काचबिंदूची परिणीती आंधळेपणात होऊ शकते. डोळ्याचा अंतर्दाब टोनोमीटरच्या साहाय्याने मोजला जातो.
४) शुष्कता (Xerophtalmia/xerosis):
व्हिटॅमिन ए च्या अभावामुळे होतो. डोळे कोरडे पडून पुढे रातांधळेपणा होऊ शकतो.
५) डोळे येणे (Conjuctivitis)
विषाणूच्या संसर्गामुळे होणारा रोग डोळे लाल होऊन खूप लागतात व चिकट पाणी येते.
६) खुपरी (Trachoma)
संसर्गजन्य रोग, घाणेरडया वस्तीत, दूषित हवेत, दूर व धुळीत राहणाऱ्यांना होतो. प्रथम पापण्यांचा आतील भाग खरखरीत होतो व नंतर त्यावर साबुदाणाच्या आकाराचे उंचवटे येतात. डोळ्याच्या उघटझापीमुळे ते बुबुळावर घासले गेल्याने बुबुळावर फुले पडतात. त्यामुळे कायमचे अंधत्व येऊ शकते.
७) रांजणवाडी (Meibomian Cyst)
पापण्यांच्या केसांच्या मुळाशी असलेल्या सूक्ष्मस्रावक ग्रंथींमधून नेहमी एक प्रकारचा चिकट द्रव बाहेर पडत असतो.
या ग्रंथी धूलिकण, केसातील कोंडा इत्यादी कारणांमुळे बंद झाल्यास द्रव बाहेर न पडल्याने सुजतात. त्यालाच रांजणवाडी असे म्हणतात.
No comments:
Post a Comment