Thursday, 7 January 2021

Coronavirus - देशभरातील सर्व जिल्ह्यांमध्ये ८ जानेवारीला दुसरा ‘ड्राय रन’.

\

🔰दशात करोना लसीकरण कार्यक्रमास सुरूवात होण्या अगोदर ८ जानेवारी रोजी देशभरातील सर्व जिल्ह्यांमध्ये दुसरा ‘ड्राय रन’ घेण्यात येणार आहे. या अगोदर २ जानेवारी रोजी संपूर्ण देशात ‘ड्राय रन’ चे आयोजन करण्यात आले होते. मात्र, तेव्हा सर्वच जिल्ह्यांमध्ये ‘ड्राय रन’ घेण्यात आलेला नव्हता. आता होणारा दुसरा ‘ड्राय रन’ हा देशातील सर्व जिल्ह्यांमध्ये होणार आहे. लसीकरणाच्या पार्श्वभूमीवर सर्वप्रथम २८ व २९ डिसेंबर रोजी चार राज्यांमधील काही ठिकाणी पहिला ‘ड्राय रन’ घेण्यात आला.


🔰पजाबा, आसाम, गुजरात आणि आंध्र प्रदेश या चार राज्यांमध्ये घेण्यात आलेल्या ‘ड्राय रन’चे परिणाम समोर आल्यानंतर, सरकारने संपूर्ण देशात ‘ड्राय रन’ घेण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर आता ८ जानेवारी रोजी पुन्हा एकदा संपूर्ण देशात ‘ड्राय रन’ पार पडणार आहे.


🔰दसरीकडे लसीकरणाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ.हर्षवर्धन हे उद्या(गुरुवार) राज्यांच्या आरोग्य मंत्र्यांबरोबर बैठक करणार आहेत. या वेळी ते राज्य सरकारच्या तयारीचा आढावा घेतील. उद्या साडेबारा वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ही बैठक होणार आहे.

No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...