Saturday, 16 January 2021

भारतात जगातल्या सर्वात मोठ्या लसीकरण कार्यक्रमाचा शुभारंभ.


🔰16 जानेवारी 2021 पासून देशभरात कोविड-19 लसीकरण मोहिमेचा शुभारंभ झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लसीकरण मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. हा लसीकरण कार्यक्रम जगभरातला सर्वात मोठा कार्यक्रम ठरणार आहे.


🅾️ठळक बाबी...


🔰कद्र सरकारने ‘कोविशिल्ड’ आणि ‘कोवॅक्सिन’ नामक लसींचे एकूण 1.65 कोटी डोस / मात्रा खरेदी केले आहेत.

देशभरातल्या सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमधल्या एकूण 3006 केंद्रांवर लसीकरणास सुरुवात झाली. प्रत्येक केंद्रावर दर दिवशी सुमारे 100 जणांना लस दिली जाणार.


🔰कार्यक्रमावर केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने विकसित केलेल्या ‘को-विन’ (Co-WIN) या डिजिटल व्यासपीठाच्या माध्यमातून लक्ष ठेवले जाणार आहे. व्यासपीठाच्या माध्यमातून लसींचा एकूण साठा, पुरवठा, लसीचे लाभार्थी, लसीचा दुसरा डोस पुन्हा कधी दिला जाणार यासारखी विस्तृत माहिती उपलब्ध असणार आहे.


🔰कोरोना लसीचे दोन डोस घेणे फार महत्वाचे आहे, पहिल्या आणि दुसऱ्या डोस दरम्यान सुमारे एक महिन्याचे अंतर देखील ठेवले जाणार. दुसऱ्या डोसच्या केवळ 2 आठव्यांनंतर आपल्या शरीरावर कोरोना विरुद्ध लढण्यासाठी आवश्यक सामर्थ्य विकसित होते.


🔰भारत लसीकरण मोहिमेच्या पहिल्या टप्प्यात 3 कोटी नागरिकांना लस देत आहे. वयोवृद्ध आणि गंभीर आजाराने त्रस्त असलेल्या नागरिकांना या टप्प्यात लस दिली जाणार. दुसऱ्या टप्प्यात 30 कोटी नागरिकांना लस देण्यात येणार आहे.लसीकरणासाठी निश्चित केलेला प्राधान्यक्रम


🔰पहिल्या गटात शासकीय आणि खासगी दवाखान्यातले आरोग्यसेवक कर्मचारी, रोजंदारीवर काम करणारे कामगार आणि एकात्मिक बालविकास प्रकल्पातले कर्मचारी यांचा समावेश आहे.


🔰दसऱ्या गटात प्रत्यक्ष संपर्कात येणाऱ्या कर्मचाऱ्यांचा समावेश आहे, ज्यात केंद्रीय पोलीस, सशस्त्र कृती दल, गृहरक्षक दल, नागरी सुरक्षा संस्थांमधले कर्मचारी, आपत्ती व्यवस्थापन स्वयंसेवक, महानगरपालिका कर्मचाऱ्यांचा यामध्ये समावेश आहे.


🔰तिसऱ्या गटात 50 वर्षांवरील आणि ज्यांना अन्य व्याधी आहेत, अशा 50 वर्षांखालील व्यक्तींचा समावेश आहे.

आरोग्यविषयक अटी


🔰लस केवळ 18 वर्षावरील लोकांनाच दिली जाणार आहे.


🔰पहिला डोस ज्या लसीचा दिला जाणार, दुसरा डोसही त्याच लसीचा लागणार.जर कोणत्या व्यक्तीला दुसरा काही आजार असेल आणि त्याला त्याची लस घ्यायची असेल, तर दोन लसींमध्ये 14 दिवसांचे अंतर असायला हवे.


🔰गरोदर महिला किंवा गरोदर असण्याची शक्यता असणाऱ्या महिला, तसेच ज्या बाळाला दूध पाजतात अशा महिलांना लस दिली जाणार नहीं.


🔰जर कोणा व्यक्तीमध्ये कोरोनाचे लक्षण असतील, तर त्या व्यक्तीला आजारातून बरे झाल्यानंतर 4 ते 8 आठवड्याने लस दिली जाणार.


🔰कोरोना रुग्ण ज्यांना मोनोक्लोनल अँटीबॉडीज किंवा प्लाझ्मा देण्यात आले आहे, त्यांना आजारातून बरे झाल्यानंतर 4 ते 8 आठवड्यांनतर लस दिली जाणार.


🔰आजारी किंवा रुग्णालयामध्ये असणाऱ्या लोकांना कोणताही आजार असला तरी त्यांना बरे झाल्यानंतर लस 4 ते 8 आठवड्यांनतर दिली जाणार.


🔰जया व्यक्तींना याआधी कोरोनाची लागण झाली आहे आणि ज्यांचा गंभीर आजाराचा इतिहास आहे, अशांना लस दिली जाणार.

No comments:

Post a Comment