Wednesday, 6 January 2021

भारतीय निवडणूक आयोग



भारतीय निवडणूक आयोग ही भारत सरकारच्या अखत्यारीतील एक स्वायत्त घटनात्मक संस्था आहे. निवडणुक आयोगाला भारतीय संविधानाच्या चार स्तंभांपैकी एक मानले जाते. भारतातील निवडणुकींसाठी निवडणूक आयोग सर्वस्वी जबाबदार आहे. निवडणूक आयोगामध्ये मुख्य निवडणूक आयुक्त आणि राष्ट्रपती नेमतील इतके अन्य निवडणूक आयुक्त यांच्यासह एक निवडणूक आयोग बनतो. ऑक्टोबर इ.स. १९९३ पासून दोन निवडणूक आयुक्त नेमण्याची प्रथा पडली(1989 मध्ये-दोन अन्य निवडणूक आयुक्त नेमले होते). तसेच एका अद्यादेशाद्वारे त्यांना मुख्य निवडणूक आयुक्त सारखाच दर्जा व स्थान देण्यात आले. मुख्य निवडणूक आयुक्तांना पार पाडण्याचे कर्तव्य लक्षात घेऊन सामाजिक प्रतिष्ठा, कायद्याचे ज्ञान आणि समृद्ध असा प्रशासकीय अनुभव असलेल्या व्यक्तीची नेमणूक राष्ट्रपती या पदावर करतात.Sunil Arora हे 23 वे व सध्याचे प्रमुख निवडणूक आयुक्त आहेत.


♦️ आतापर्यंतचे भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त


🔹 सुकुमार सेन : २१ मार्च १९५० ते १९ डिसेंबर १९५८

🔹 कल्याण वैद्यनाथन सुंदरम : २० डिसेंबर १९५८ ते ३० सप्टेंबर १९६७

🔹 एस.पी. सेन वर्मा : १ ऑक्टोबर १९६७ ते ३० सप्टेंबर १९७२

🔹 महाराज डॉ. नागेन्द्र सिंह : १ ऑक्टोबर १९७२ ते ६ फेब्रुवारी १९७३

🔹 टी. स्वामीनाथन : ७ फेब्रुवारी १९७३ ते १७ जुन १९७७

🔹 एस.एल. शकधर : १८ जुन १९७७ ते १७ जुन १९८२

🔹 राम कृष्ण त्रिवेदी : १८ जुन १९८२ ते ३१ डिसेंबर १९८५

🔹 आर.व्ही.एस. पेरी शास्त्री : १ जानेवारी १९८६ ते २५ नोव्हेंबर १९९०

🔹 श्रीमती व्ही. एस. रमादेवी : २६ नोव्हेंबर १९९० ते ११ डिसेंबर १९९०

🔹 टी.एन. सेशन : १२ डिसेंबर १९९० ते ११ डिसेंबर १९९६

🔹 एम. एस. गिल : १२ डिसेंबर १९९६ ते १३ जुन २००१

🔹 जेम्स मायकल लिंगडोह : १४ जुन २००१ ते ७ फेब्रुवारी २००४

🔹 टी. एस. कृष्णमूर्ती : ८ फेब्रुवारी २००४ ते १५ मे २००५

🔹 ब्रिज बिहारी टंडन : १६ मे २००५ ते २८ जुन २००६

🔹 एन. गोपालस्वामी : २९ जुन २००६ ते १९ एप्रिल २००९

🔹 नवीन चावला : २० एप्रिल २००९ ते २९ जुलै २०१०

🔹 शाबुद्दिन याकुब कुरेशी : ३० जुलै २०१० ते १० जून २०१२

🔹 वीरावल्ली सुंदरम संपथ : ११ जून २०१२ ते १५ जानेवारी २०१५

🔹 हरिशंकर ब्रम्हा :१६ जानेवारी २०१५ ते १९ एप्रिल २०१५

🔹 नसीम जैदी :१९ एप्रिल २०१५ ते ६ जुलै २०१७

🔹 अचल कुमार जोति :६ जुलै २०१७ ते 22 जानेवारी 2018

🔹 ओमप्रकाश रावत : 23 जानेवारी 2018 ते 1 डिसेंबर 2018

🔹 सुनील अरोरा : 2डिसेंबर 2018 पासुन पुढे

No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...