Sunday, 3 January 2021

एस्टोनिया, पराग्वे आणि डॉमनिक प्रजासत्ताकमध्ये तीन भारतीय मिशन उघडण्याला मंत्रिमंडळाची मान्यता



पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाच्या झालेल्या बैठकीमध्ये एस्टोनिया, पराग्वे आणि डॉमनिक प्रजासत्ताक या देशांमध्ये तीन भारतीय मिशन उघडण्याला मान्यता देण्यात आली.


देशांमध्ये भारतीय मिशन सुरू झाल्यामुळे तिनही देशांबरोबर राजनैतिक संबंध विस्तारण्यास मदत मिळणार असून ते अधिक सखोल होणार. त्यामुळे व्दिपक्षीय व्यापार, गुंतवणूक आणि आर्थिक व्यवहार यांच्यामध्ये वाढ होऊ शकणार आहे. त्याचबरोबर दोन्ही बाजूंच्या लोकांना एकमेकांशी सुलभतेने संपर्क साधणे शक्य होणार आहे. बहुपक्षीय क्षेत्रामध्ये राजकीय प्रसार वाढवून भारताच्या परराष्ट्र धोरणाची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी या देशांची मदत मिळू शकणार आहे.


देशांमध्ये उघडण्यात आलेल्या भारतीय मिशनमुळे तिथे वास्तव्य करणाऱ्या भारतीयांना चांगल्या प्रकारे मदत मिळू शकणार असून त्यांच्या हिताचे रक्षण करू शकणार आहे.


एस्टोनिया हा उत्तर युरोपामधील बाल्टिक समुद्राच्या किनार्‍यावर वसलेला एक छोटा देश आहे. एस्टोनियाच्या उत्तरेला फिनलंडचे आखात, पूर्वेला रशिया, दक्षिणेला लात्व्हिया तर पश्चिमेला बाल्टिक समुद्र आहेत. 


तालिन ही एस्टोनियाची राजधानी आहे आणि युरो हे राष्ट्रीय चलन आहे.

पराग्वे हा दक्षिण अमेरिकेतला एक देश आहे. त्याच्या दक्षिणेला व नैऋत्येकडे अर्जेटिना, पूर्वेला व ईशान्य दिशेला ब्राझील व वायव्य दिशेला बोलिव्हिया आहे. असुन्सियोन ही पराग्वेची राजधानी आहे आणि गुआरानी आणि पेसो ही राष्ट्रीय चलने आहेत.


डॉमनिक प्रजासत्ताक हा कॅरिबियाई प्रदेशाच्या ग्रेटर अँटिल्स बेट-समूहातल्या हिस्पॅनियोला बेटावर वसलेला देश आहे. सॅंटो डोमिंगो ही त्याची राजधानी आहे आणि पेसो हे राष्ट्रीय चलन आहे.

No comments:

Post a Comment

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...