Thursday, 7 January 2021

केरळमध्ये राज्यस्तरीय आपत्ती जाहीर‼️



📌कोरोना लस आल्यानंतर काहीसा दिलासा मिळेल, असं वाटत असतानाच आता नवं संकट घोंघावू लागलंय. देशातल्या अनेक राज्यांमध्ये बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव झालाय. यामुळे शेकडो कावळे आणि इतर पक्ष्यांचा मृत्यू झालाय. राजस्थान, मध्य प्रदेश यांच्यानंतर आता हिमाचल प्रदेश आणि केरळपर्यंत या बर्ड फ्लूने भीतीचं वातावरण निर्माण केलीय.


📌या पार्श्वभूमीवरच राज्य सरकारांनी अलर्ट जारी केलाय. केरळने तर या संकटाला नियंत्रणात आणण्यासाठी राज्यात आपत्ती घोषीत केलीय. महाराष्ट्रात बर्ड फ्लूची एकही घटना आढळली नाही. पण सरकारनं खबरदारीचा उपाय म्हणून अलर्ट जारी केलाय. प्रशासनासाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्यात.


📌शजारच्याच मध्य प्रदेशात २३ डिसेंबर ते ३ जानेवारीपर्यंत ३७६ कावळ्यांचा मृत्यू झालाय. यामध्ये सर्वाधिक घटना या इंदौरमधल्या आहेत. याशिवाय मंदसौर, आगर-मालवा, खरगोन, सिहोर या जिल्ह्यातही कावळ्यांच्या मृत्यूच्या घटना समोर आल्यात.


📌हिमाचल प्रदेशातही कांगडा इथल्या तलावात हजारोंच्या संख्येने स्थलांतरित पक्षी मृतावस्थेत आढळले. या पक्ष्यांचाही मृत्यू एच५एन१ म्हणजेच बर्ड फ्लूनं झाल्याचं तपासणीतून सिद्ध झालंय. खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनानं तलावाशेजारच्या भागात मांस तसंच अंडा विक्रीवर निर्बंध घातलेत.


📌हरियाणामध्येही कोंबड्यांच्या संशयास्पद मृत्यूने एवियन फ्लूची भीती तयार झालीय. इथल्या बरवाला भागात जवळपास १ लाख कोंबड्या आणि पिलांचा मृत्यू झालाय. गुजरातच्या जूनागड भागातही बर्ड फल्यूमुळे दहशतीचं वातावरण निर्माण झालंय.


📌तिकडे राजस्थानामध्ये अनेक जिल्ह्यांमध्ये बर्ड फ्लूच्या केसेस सापडल्यात. झालावाड जिल्ह्यात बर्ड फ्लूची पहिली केस आढळली. इथे एकाचवेळी शेकडो कावळ्यांचा मृत्यू झाला होता. यानंतर कोटा, पाली, राजधानी जयपूर, बारां आणि जोधपूर इथूनही कावळ्यांच्या मृत्यूच्या बातम्या येत आहेत.


📌करळच्या अलापुझा आणि कोट्टायम जिल्ह्यात बर्ड फ्लूच्या केसला दुजोरा मिळालाय. जवळपास सतराशे बदकांचा मृत्यू झालाय. इथले नमुने तपासणीसाठी भोपाळच्या प्रयोगशाळेला पाठवण्यात आलेत. ८ पैकी ५ नमुन्यांमध्ये बर्ड फ्लूची लक्षणं आढळली.

No comments:

Post a Comment

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...