Friday, 1 January 2021

सिंहगड इन्स्टिट्युट ची प्लेसमेंट मध्ये उत्तुंग झेप


 देशातील विविधनामांकित कंपनीत सिंहगड संस्थेतील विद्यार्थ्यांना नोकऱ्या मिळत आहेत. सिंहगड संस्थेत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी माहिती तंत्रज्ञान सेवा, व्यापाराभिमुख प्रणाली सेवा आणि आउंटसोर्सिंग सेवा पुरवठा या क्षेत्रात काम करण्याची संधी प्राप्त झाली असल्याची माहिती प्लेसमेंट विभाग प्रमुख प्रा. जयप्रकाश पितांबरे यांनी माहिती दिली.

“टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस” या उद्योग समूहातील सर्वाधिक बाजार मुल्यांकन असलेली व्यापारी संस्था आहे. २००७-०८ या आर्थिक वर्षात ११६,३०८ कर्मचारी, ४७ देशातील कार्यालये आणि ५.७ अब्ज अमेरिकी डॉलर वार्षिक उत्पन्न असलेली टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टी.सी.एस.) कंपनी आहे. भारतातील माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील सर्वात मोठी व्यापारी संस्था म्हणून “टीसीएस” चा उल्लेख केला जातो.


“टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस” या कंपनीत सिंहगड संस्थेत अंतीम वर्षात( २०२१)मध्ये अभियांत्रिकीची पदवी प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या “टीसीएस” कंपनीकडून ऑनलाईन मुलाखती घेण्यात आल्या होत्या. या मुलाखतीतून कंपनीत आवश्यक असलेली शैक्षणिक गुणवत्ता, उपयुक्त ज्ञान, शिस्त या सर्व गोष्टींवर “टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस” या कंपनीतील मुलाखत घेणारे अधिकारी प्रभावित झाले. कंपनीत आवश्यक असलेले सर्व गुण सिंहगड संस्थेतील विद्यार्थ्यांकडे दिसुन आल्याने सिंहगड मधील ३८२ विद्यार्थ्यांची कॅम्पस मुलाखतीतून निवड करण्यात आली. त्यामधील ३२७ विद्यार्थ्यांची “टीसीएस नॅशनल काॅलिफायर टेस्ट” (एन क्यु टी) परिक्षेमधुन निवड झाली आहे तसेच ५५ विद्यार्थ्यांची “टीसीएस कोड विटा” परिक्षेमधुन निवड झाली आहे. यशस्वी विद्यार्थ्यांचे पालक वर्गातून अभिनंदन होत आहे.


भविष्यातील आधुनिक तंत्रज्ञानाची गरज लक्षात घेऊन सिंहगड संस्था विद्यार्थ्यांना अपेक्षित शैक्षणिक सुविधा व नवीन मुल्यवर्धित कार्यशाळा यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा शैक्षणिक विकास व औद्योगिक तंत्रज्ञानाशी अनुसरून शिक्षण देत आहे. याशिवाय सिंहगड संस्थेच्या प्रत्येक महाविद्यालयामध्ये ट्रेनिंग व प्लेसमेंट यांचा स्वतंत्र विभाग आहे. यामुळे विद्यार्थ्यांना कंपनीत आवश्यक असलेल्या तंत्रज्ञानाची माहिती देऊन प्रशिक्षण दिले जाते. त्यामुळेच आज सिंहगड संस्थेमधील विद्यार्थी “टीसीएस” सारख्या नामांकित कंपनीत निवडला जात आहे.
“टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस” या कंपनीत निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे संस्थेतील सर्व पदाधिकारी यांच्यासह कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

No comments:

Post a Comment

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...