Wednesday 6 January 2021

चर्चित शहर/देश /राज्य :-


• अरुणाचल प्रदेश:-

हे राज्य संपूर्णत: हागणदारीमुक्त राज्य म्हणून घोषित करण्यात आले. हागणदारीमुक्त ठरलेले हे भारतातील सहावे राज्य ठरले. या अगोदर   सिक्किम, हिमाचल प्रदेश, केरळ, हरियाणा आणि उत्तराखंड हे पाच राज्य हागणदारीमुक्त ठरले आहे 


• तामिळनाडू:-

राज्य पोलीस दलातील सेवा तृतीयपंथी व्यक्तीसाठी खुले करण्याचा निर्णय तामिळनाडू सरकाने घेतला .असा निर्णय घेणारे तामिळनाडू हे देशातील पहिले राज्य ठरले 


• केरळ :-

केरळ देशातील ४  विमानतळे असलेले भारतातील  पहिले राज्य  आहे. कोचीन, त्रिवेंद्रम, कालिकत आणि कन्नूर येथे आंतरराष्ट्रीय विमानतळे आहेत.


• दिल्ली:-

भारतातील पहिले राष्ट्रीय पोलीस संग्रहालय दिल्लीच्या लुटियन भागात बनवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.केंद्रीय पोलीस दल आणि राज्यांच्या पोलीस दलांच्य इतिहासाचा अभ्यास करण्याची संधी या संग्रहालयामुंळे मिळणार आहे. पोलीसांचे गणवेश आणि पोलीसांशी संबंधित अन्य सामग्रीचा संग्रह यात करण्यात येणार आहे.


• फगवाडा (पंजाब):-

पंजाब (फगवाडा ) येथे सुरु असलेल्या १०६ व्या इंडियन सायन्स कॉंग्रेसमध्ये देशातील पहिली चालकविना बस धावली .


• राजस्थान

राष्ट्रीय जैव इंधन धोरण  (National Biofuel Policy) लागू करणारे भारतातील पहिले राज्य राजस्थान ठरले 


• मुंबई :-

केंद्र शासन ,राज्य शासन यांच्या सयुक्त विद्यमाने २५ वी जागतिक भागीदारी परिषद मुंबई येथे आयोजित केली आहे .२५ वर्षात मुंबईला आयोजक होण्याचा प्रथमच मान मिळाला 


• पाटणा देवी (चाळीसगाव):-

गणितीय खेळांची सांगड घालत गणित सोप करून सांगणारा गणितीतज्ञ भास्कराचार्य गणितनगरी प्रकल्प चाळीसगाव तालुक्यातील पाटणा देवी येथे उभारला जात आहे 


• सातारा

महाराष्ट्रातील पहिला मेगा फूड पार्क सातारा येथे  स्थापन करण्यात येत आहे 


• चंदिगढ़

सैन्य साहित्य महोत्सव-2018’ चे आयोजन चंदिगड या शहरात करण्यात आले होते


• बुडापेस्ट

2023 या वर्षामध्ये आईएएएफ (IAAF) विश्व अथॅलेटिक्स चॅपियनशिप ची स्पर्धा पार पडणार आहे


• भोपाळ

भारतातील पहिला वैश्विक कौशल (Mutti-Skill) पार्क स्थापन होत आहे :- 


• सिंगापुर

6 सप्टेंबर , 2018 रोजी सोशल नेटवर्किंग साइट फेसबुक ने सिंगापुर येथे आशियातील पहिले  डेटा सेंटर सुरु करण्याची घोषणा केली 


• बुंदेलखंड एक्सप्रेस-वे

21 ऑगस्ट  2018 रोजी उत्तरप्रदेश सरकाने माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या सन्मानार्थ बुंदेलखंड एक्सप्रेस-वे चे नाव ‘अटल पथ’ असे केले 


• तेलंगाना

या राज्य सरकार ने बायोटेक आणि बायोफार्मा क्षेत्रासाठी ‘बी. हब’ स्थापित करण्याचा निर्णय घेतला


• गुरुग्राम

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण बोर्ड ने भारतातील सर्वाधिक प्रदूषित शहर म्हणून घोषित केले


• दंतेवाड़ा

अटल बिहारी वाजपेयी एजुकेशन सिटी छत्तीगढ़ मध्ये दंतेवाड़ा या ठिकाणी स्थापन केले  जाणार आहे 


• झारखंड

या राज्यात भारतातील पहिला खादी मॉल स्थापन केला जात आहे 


• उत्तर प्रदेश

या राज्यात विद्युत चोरी बंद करण्यासाठी प्रत्येक जिल्हात एंटी पॉवर थेफ्ट पुलिस स्टेशन स्थापन करण्याचा निर्णय घेतला 


• गुवाहाटी

 हे रेल्वे स्टेशन भारतातील पहिले सौर ऊर्जा संचालित स्टेशन ठरले 


• महाराष्ट्र

डीजीटल स्वाक्षरी असलेले ७/१२ देणारे भारतातील पहिले राज्य कोणते:- 


• पूर्वी गोदावरी (आंध्र प्रदेश )

भारतातील १००% एलईडी स्ट्रीट लाइटिंग असणारा पहिला जिल्हा  


• सूरत (गुजरात)

भारतातील १०० % सौरऊर्जा ने संचालित प्राथमिक स्वास्थ्य केंद्र (पीएचसी) असणारा पहिला जिल्हा :-


• तमिळनाडु( तमिळनाडु कृषि विश्वविद्यालय, कोईमतूर)

भारतातील पहिले  कीटक  संग्रहालय या राज्यात स्थापन करण्यात येत आहे :-


• फरीदाबाद

भारतातील पहिले पॅरालंपिक भवन येथे स्थापित केले जात आहे 


•  कर्नाटक

या राज्यात जगातील सर्वात मोठा सौर ऊर्जा पार्क ‘शक्तिस्थल’ स्थापन करण्यात आले


मिशन नोकरी

• गांधीनगर रेल्वे  स्टेशन (जयपुर)

भारतातील संपूर्ण महिला कर्मचारी असलेले पहिले स्थानक ठरले या अगोदर मुंबईतील माटुंगा हे ‘ संपूर्ण महिला कर्मचारी असलेले पहिले स्थानक ठरले होते परंतु ते सब-अर्बन (उप-नगरीय) ररेल्वे स्टेशन आहे


• कलकत्ता :- 

भारतातील पहिल्यांदा तरंगता बाजार म्हणजेच 'फ्लोटिंग मार्केट' पश्चिम बंगाल येथील कलकत्ता येथे सुरु करण्यात आला आहे 

No comments:

Post a Comment