Friday, 22 January 2021

बायडेन यांनी राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेताच पंतप्रधान मोदींनी केलं ट्विट; म्हणाले.



🎲जो बायडेन यांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची बुधवारी सूत्रं स्वीकारली. अमेरिकेत झालेल्या सत्तांतराचं देशभरातून स्वागत करण्यात आलं. विविध देशांच्या प्रमुखांनी बायडेन यांचं अभिनंदन केलं. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही बायडेन यांनी शपथ घेतल्यानंतर ट्विट करत त्यांचं अभिनंदन केलं.


🎲बायडेन यांनी अमेरिकेच्या अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी ट्विट केलं. बायडेन यांचं अभिनंदन करतानाच मोदी म्हणाले,”भारत-अमेरिकेतील संबंध समान मूल्यांवर आधारित आहे. आपल्याकडे भरीव असा बहुअंगी द्विपक्षीय अजेंडा आहे. जो आर्थिक गुंतवणुकीबरोबरच उत्साही लोकांसोबतचे संबंध वृद्धिंगत करत आहे. भारत-अमेरिकेतील भागीदारी नव्या उंचीवर नेण्यासाठी बायडेन यांच्यासोबत काम करण्यास कटिबद्ध आहे,” असं पंतप्रधान मोदी यांनी म्हटलं आहे.


🎲“अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रं स्वीकारल्याबद्दल मी जो बायडेन यांचं अभिनंदन करतो. भारत-अमेरिका यांच्यातील राजनैतिक संबंध अधिक मजबूत करण्यासाठी मी बायडेन यांच्यासोबत काम करण्याची प्रतीक्षा करत आहे. अमेरिकेचं यशस्वी नेतृत्व करण्यासाठी माझ्या शुभेच्छा कारण, आपल्याला जागतिक शांतता आणि सुरक्षा पुढे नेण्यासाठी समान आव्हानांचा सामना करावा लागत आहे,” असंही मोदी यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

No comments:

Post a Comment