17 जानेवारी 2021 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे देशाच्या विविध भागांमधून गुजरातच्या केवडियाकडे जाणाऱ्या आठ रेल्वेगाडयांना हिरवा झेंडा दाखवला. या गाड्या स्टॅच्यू ऑफ युनिटीपर्यंत थेट प्रवासाची सेवा उपलब्ध करून देत आहेत.
याप्रसंगी, दाभोई-चांदोड गेज रूपांतरित ब्रॉडगेज रेल्वे मार्ग, चांदोड-केवडिया नवीन ब्रॉडगेज रेल्वे मार्ग, नव्याने विद्युतीकरण केलेला प्रतापनगर-केवडिया मार्ग आणि दाभोई, चांदोड व केवडिया या नवीन स्थानक इमारतींचेही उद्घाटन झाले.
ठळक बाबी
रेल्वेच्या इतिहासात प्रथमच देशाच्या वेगवेगळ्या कोपऱ्यातून एकाच ठिकाणी जाणाऱ्या गाडयांना एकाच वेळी रवाना करण्यात आले आहे.
या गाड्या चेन्नई, वाराणसी, रेवा, दादर आणि दिल्ली तसेच प्रतापनगर, चांदोड येथून सोडण्यात आल्या.
याचा फायदा पर्यटक आणि स्थानिक आदिवासी दोघांनाही होणार आहे. कारण त्यामुळे स्वयंरोजगार व रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होणार.
केवडिया स्थानक हे हरित इमारत प्रमाणीकरणासह कार्यरत होणारे भारतातले पहिले रेल्वे स्थानक आहे.
केवडिया सर्व सुविधांसह संपूर्ण कुटुंबासाठी उत्तम पर्यटन स्थळ बनले आहे. तेथील आकर्षणांमध्ये, भव्य स्टॅच्यू ऑफ युनिटी, सरदार सरोवर, विशाल सरदार पटेल प्राणीविज्ञान पार्क, आरोग्य वन आणि जंगल सफारी आणि पोषण पार्क यांचा समावेश आहे. त्यात ग्लो गार्डन, एकता क्रूझ आणि वॉटर स्पोर्ट्स देखील आहेत. तेथील एकता मॉलमध्ये स्थानिक हस्तकलेच्या वस्तूंसाठी नवीन संधी आहेत. आदिवासी गावांमध्ये होम स्टेसाठी सुमारे 200 खोल्या विकसित केल्या जात आहेत.
गुजरात राज्यात केवडिया येथे “स्टॅच्यू ऑफ युनिटी” या नावाने भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे नेते सरदार वल्लभभाई पटेल यांचा भव्य पुतळा उभारण्यात आला आहे. हा पुतळा 182 मीटर (597 फूट) उंचीचा आहे. हा नर्मदा नदीच्या किनारी उभारण्यात आलेला जगातला सर्वाधिक उंचीचा पुतळा आहे.
हा पुतळा राजपिपळा शहराजवळ नर्मदा धरणाजवळच्या साधू बेटावर उभारलेला आहे. ही शिल्पाकृती जगप्रसिद्ध शिल्पकार राम सुतार यांनी साकारली. विक्रमी 33 महिन्यांमध्ये पुतळ्याचे बांधकाम केले गेले.
No comments:
Post a Comment