🔰अमेरिकेचे मावळते अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या समर्थकांच्या मदतीने कॅपिटॉल हिल इमारतीत हिंसाचार घडवून आणल्याच्या आरोपावरून त्यांना पदच्युत करण्यासाठी महाभियोग कारवाईसाठी बुधवारी प्रतिनिधीगृहात मतदान होत आहे.
🔰परतिनिधीगृहात डेमोक्रॅटिक पक्षाचे बहुमत असल्याने महाभियोगाच्या कारवाईचा प्रस्ताव मंजूर होण्याचीच शक्यता अधिक आहे. काँग्रेसचे सदस्य जेमी रसकीन व डेव्हिड सिसीलाइन तसेच टेड लिउ यांनी महाभियोग ठरावाची रचना केली असून त्याला २११ सदस्यांनी पाठिंबा दिला आहे.
🔰परतिनिधीगृहातील बहुमताचे नेते स्टेनी हॉयर यांनी सांगितले की, बुधवारी महाभियोग कारवाईच्या प्रस्तावावर मतदान घेण्यात येईल. ट्रम्प यांच्यावर महाभियोगाची कारवाई करण्यासाठी त्यांच्यावर ६ जानेवारी रोजी हिंसाचारास उत्तेजन दिल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. त्यांनी केलेल्या भाषणानंतर त्यांच्या समर्थकांनी कॅपिटॉल हिल येथे हिंसाचार केला होता. त्यानंतर प्रतिनिधी वृंदाच्या मतांची मोजणी काही काळ थांबवण्यात आली होती. या हिंसाचारात पाच जण ठार झाले होते.
🔰डमोक्रॅटिक पक्षाचे प्रतिनिधीगृहात बहुमत असून सेनेटमध्ये रिपब्लिकन व डेमोक्रॅट यांच्यात ५१-५० एवढीच तफावत असून दोन तृतीयांश सदस्यांचे मत हे महाभियोग कारवाईसाठी गरजेचे असते. बहुमताचे नेते मिच मॅकोनेल यांनी सांगितले की, वरिष्ठ सभागृहात २० जानेवारी म्हणजे बायडेन यांच्या शपथविधी आधी मतदान होऊ शकणार नाही.
No comments:
Post a Comment