Wednesday, 6 January 2021

आर्सेनिकचे प्रदूषण


✍️आर्सेनिक हा जवळजवळ सर्व प्रकाराच्या जीवनासाठी विषारी ठरतो, परंतु अलीकडेच वॉशिंग्टन विद्यापीठाच्या संशोधकांना एका अभ्यासातून असा शोध लागला आहे की प्रशांत महासागरातले काही सूक्ष्मजीव पाण्यातल्या या विषारी घटकाला सहन करण्यासोबतच सक्रियपणे श्वसनासाठी आत्मसात केले आहे.


✍️बदलत्या वातावरणाशी कश्याप्रकारे जुळवून घेतले जाते त्याबाबत हा शोध घेतला गेला.


◾️आर्सेनिक पदार्थ:-


✍️आर्सेनिक (As) एक गंधहीन आणि चव नसलेला उपधातू आहे, जो भूमीच्या पृष्ठभागाखाली प्रचंड प्रमाणात उपलब्ध आहे. हा पदार्थ सामान्यपणे शीळा, माती, पाणी आणि हवेत आढळतो. हा पृथ्वीवर प्रचंड प्रमाणात आढळून येणार्‍या पदार्थांमधील 26वा पदार्थ आहे. प्रमाणानुसार, आर्सेनाइट As-3 याला आर्सेनिकचे सर्वात विषारी स्वरूप मानले जाते. शिवाय आर्सेनिकचे मिथाइलेटेड स्वरूप {MMA(V), DMA(V), MMA(III), DMA(III)} देखील विषारी असतात. जैव-इंधन जाळणे, रासायनिक खते, उद्योग हे या पदार्थाचे मुख्य स्त्रोत आहेत.


✍️मानवी जीवनास विषारी ठरणार्‍या आर्सेनिकमुळे ‘आर्सेनिकोसिस’ ही वैद्यकीय समस्या उद्भवते. त्यामुळे शरीरातल्या उपलब्ध आवश्यक एनजाइमवर नकारात्मक परिणाम होतो, ज्यामुळे बरेच अवयव काम करणे बंद करतात तसेच त्वचेचे रोग, कर्करोग सारख्या गंभीर आरोग्य समस्या उद्भवतात.


✍️पयजलात आर्सेनिकसाठी WHO कडून ठरविण्यात आलेल्या मानकानुसार, पेयजलातली या पदार्थाची कमाल पातळी (MLC) 10 PPB एवढी आहे. भारतामध्ये हे प्रमाण 50 PPB एवढे स्वीकृत करण्यात आले आहे.


✍️भारतात पश्चिम बंगाल, बिहार, उत्तरप्रदेश, झारखंड, छत्तीसगड, आसाम, नागालँड, मणीपूर, त्रिपुरा, अरुणाचल प्रदेश इत्यादी राज्यांमध्ये आर्सेनिकचा प्रभाव आढळून येतो.

No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...