Sunday, 10 January 2021

भारताने ‘राष्ट्रीय अणु कालमापक’ विकसित केले


4 जानेवारी 2021 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ‘देशाच्या सर्वसमावेशक विकासासाठी मापनशास्त्र’ या संकल्पनेखाली आयोजित केलेल्या ‘राष्ट्रीय मापन शास्त्र परिषद 2021’ याचे उद्‌घाटन झाले. याप्रसंगी ‘राष्ट्रीय अणु कालमापक’ आणि ‘भारतीय निर्देशक द्रव्य प्रणाली’ हे महत्वाचे शोध राष्ट्राला अर्पण करण्यात आले.


राष्ट्रीय भौतिकी प्रयोगशाळा (CSIR-NPL) या संस्थेनी ‘राष्ट्रीय अणु कालमापक’ तयार केला आहे.2.8 नॅनो सेकंदापर्यंतची अचूक वेळ मोजण्यात कालमापक सक्षम आहे.


भारत आता एका नॅनो सेकंदाच्या कालमापन करण्याच्या बाबतीत आत्मनिर्भर झाला आहे. आता भारतीय प्रमाण वेळ 3 नॅनो सेकंदापेक्षा कमी अंतराने आंतरराष्ट्रीय प्रमाण वेळेशी जुळते.


ह्या प्रणालीची ISRO सारख्या अति अचूक तंत्रज्ञानाशी संबंधित काम करणाऱ्या संस्थांना मोठी मदत होणार आहे. बँकिंग, रेल्वे, संरक्षण, आरोग्य, दूरसंचार, हवामान अंदाज, आपत्ती व्यवस्थापन आणि अशा आधुनिक तंत्रज्ञानाशी संबंधित अनेक क्षेत्रांना याचा मोठा फायदा होणार आहे.

No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...