Tuesday 5 January 2021

राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेचे यजमानपद महाराष्ट्राकडे.


🔰वरिष्ठ राष्ट्रीय कबड्डी अजिंक्यपद स्पर्धेचे यजमानपद महाराष्ट्राने सांभाळावे, असा प्रस्ताव भारतीय हौशी कबड्डी महासंघाकडून देण्यात आला आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य कबड्डी महासंघाचे सरकार्यवाह अ‍ॅड. आस्वाद पाटील यांनी दिली.


🔰तर येत्या 9 जानेवारीला भारतीय कबड्डी महासंघाची ऑनलाइन कार्यकारिणी समितीची बैठक होणार आहे. या सभेला पाटील आणि कार्यकारिणी सदस्य सचिन भोसले महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार आहेत.


🔰तसेच या पाश्र्वभूमीवर महाराष्ट्राला राष्ट्रीय स्पर्धेच्या यजमानपदाविषयी भारतीय महासंघाच्या पदाधिकाऱ्यांकडून विचारणा केली जात आहे.


🔰महाराष्ट्राला राष्ट्रीय स्पर्धेचे यजमानपद मिळाल्यास  मुंबई उपनगर आणि ठाणे या जिल्हा संघटनांनी आयोजनासाठी उत्सुकता दर्शवली आहे.

No comments:

Post a Comment