Thursday, 13 June 2024

नगरपरिषद

🔹नगरपरिषदेचे स्वरूप 


* महाराष्ट्रात नागरपरिषदांची संख्या २२१ एवढी आहे. महाराष्ट्र शासनाच्या कायद्याने नगरपरिषदासाठी एकच कायदा आहे.

* या कायद्याप्रमाणे किमान २५ हजार लोकसंख्या असलेले क्षेत्र हे नागरी क्षेत्र म्हणून जाहीर केले जाते.

* लोकसंख्येनुसार नागरी क्षेत्राचे तीन वर्ग केले जातात. एक लाखाहून अधिक लोकसंख्या - अ वर्ग, चाळीस हजाराहून जास्त पण एक लाखाहून कमी लोकसंख्या - ब वर्ग, चाळीस हजार किंवा त्याहून कमी लोकसंख्या क वर्ग नगरपरिषद असे आहे.

* जर प्रसिद्ध थंड हवेची ठिकाणे व धार्मिक स्थळे असतील पण रहिवाशाची संख्या कमी असेल तर त्या ठिकाणी पर्यटक संख्या जास्त येत असेल तर त्या ठिकाणी लोकसंख्येची अट न लावता नगरपरिषद स्थापन केलेल्या आहेत. जसे महाबळेश्वर माथेरान, पन्हाळा, पाचगणी, चिखलदरा या ठिकाणी नगरपरिषदा आहेत.


📚नगरपरिषदेची रचना 

* शहरातील लोकसंख्येनुसार नगरपरिषदेच्या सभासदांची संख्या ठरविण्यात आलेली आहे. जसे अ वर्ग नगरपरिषद कमीतकमी ३८ व जास्तीतजास्त ६५ सभासद असते. ब वर्ग नगरपरिषदेत २३ ते ३७ सभासद, क वर्ग नगरपरिषदेत १७ ते २३ सभासद असतात.

* नगरपरिषदेच्या सदस्यांची निवड शहरातील लोकांकडून प्रौढ मताधिकार पद्धतीने केली जाते. इमावसाठी २७% जागा राखीव, तर अनुसूची जाती व जमाती त्यांच्या लोकांवर सभासदसंख्या अवलंबून असते.

* नगरपरिषदेचा कार्यकाळ ५ वर्षाचा असतो. राज्यशासनाला नगरपरिषद बरखास्त करण्याचा अधिकार आहे.


📚नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष 

* नगरपरिषदेतील निर्वाचित सदस्य आपल्यातून एकाची अध्यक्षपदी निवड करतात ही निवड साध्या बहुमताने होते.

* ठरलेल्या आरक्षणानुसार त्यांची निवड केली जाते. नगराध्यक्षांचा कार्यकाळ ५ वर्षाचा असतो. सदस्यांमधून उपनगराध्यक्षाची निवड होते.

* उपनगराध्यक्षाला बरखास्त करण्यासाठी २/३ बहुमताने ठराव मंजूर करून घ्यावा लागतो आणि त्याची निवड झाल्यापासून ६ महिन्यापर्यंत असा ठराव मांडता येत नाही.

* नगरपरिषद बरखास्त करण्याचा अधिकार राज्यशासनास आहे जर गैरवर्तन व भ्रष्टाचार यासारख्या गोष्टी आढळून आल्यास अशी कारवाई केली जाते.


🔹समित्या 

* नगरपरिषदेची स्थायी समिती आणि सार्वजनिक बांधकाम, शिक्षण, सार्वजनिक आरोग्य, पाणीपुरवठा व जलनिस्साणारन, नियोजन व विकास या विषयासाठी पाच समित्या असतात.

* प्रत्येक समिती आपल्या विषयाचा कार्यक्रम तयार करणे व त्याच्या अंमलबजावणीवर देखरेख ठेवते.

* स्थायी समिती ही सर्व समितीच्या कार्यात महत्वाचे कार्य करते. नगराध्यक्ष हा स्थायी समितीचा पदसिद्ध अध्यक्ष असतो.

* विषय समित्या आणि स्थायी समित्या हे जे निर्णय घेतात त्याला नगरपरिषदेच्या सभेची मान्यता लागते.


📚मख्य अधिकारी

* मुख्य अधिकारी हा नगर परिषदेचा मुख्य प्रशासक असतो. त्याची नेमणूक राज्य शासनामार्फत होते. नगरपरिषदेचा अर्थसंकल्प तो तयार करतो. तसेच हिशेब व दफ्तार ठेवतो.


📚नगरपरिषदेची कार्ये, उत्पन्नाची साधने, नियंत्रण 

* नगरपरिषदेच्या कार्याची विभागणी आवश्यक कार्ये आणि ऐच्छिक कार्ये अशी केलेली असते. आवश्यक कार्यात पिण्याच्या पाण्याचा पुरवठा, रस्ते, पूल यांचे बांधकाम, सांडपाणी व कचरा यांची विल्हेवाट, पशुवैद्यक केंद्रे, प्रसाधनगृहे, शौचायल अशा विविध कामांचा समावेश होतो.

* उत्पन्नाच्या साधनांच्या बाबतीत कर, इमारती व जमिनीवरील कर, घरपट्टी, पाणीपट्टी, व्यवसाय कर, नाट्यगृहे, चित्रपट गृहे, जाहिरात कर, यात्रा कर, इत्यादी नगरपरिषदेची उत्पन्नाची साधने आहेत.

* नागरी स्थानिक संस्थांवर नियंत्रण ठेवणारी यंत्रणा प्रत्येक घटकराज्यात आहे व महाराष्ट्रात राज्यशासनास, विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांच्यामार्फत नागरी संस्थावर आलेले आहे.


No comments:

Post a Comment