🔶अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा कार्यकाळ लवकरच संपुष्टात येणार आहे. अवघ्या काही तासांनंतर अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष जो बायडेन हे राष्ट्राध्यक्ष पदाची शपथ घेणार आहे. यापूर्वी मावळते राष्ट्राध्यक्ष म्हणून ट्रम्प यांनी दिलेल्या भाषणामध्ये अमेरिकेतील जनतेला संबोधित केलं.
🔶यामध्ये त्यांनी ६ जानेवारी रोजी अमेरिकेच्या राजधानीमध्ये कॅपिटॉल हिल येथे झालेल्या हिंसेबद्दल दु:ख व्यक्त केलं. तसेच ट्रम्प सरकारने चीनलाही इशारा दिला. याचवेळी ट्रम्प प्रशासनाने मित्रदेश असणाऱ्या भारताला दोन देशांपासून सावध राहण्याचा इशारा दिला आहे.
🔶टरम्प सरकारमध्ये परराष्ट्रमंत्री म्हणून काम करणाऱ्या माइक पोम्पिओ यांनी भारतासाठी एक खास ट्विट केलं आहे. यामध्ये पोम्पिओ यांनी ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष जायर बोल्सोनारो आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबतचा फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत त्यांनी भारत आणि ब्राझील या दोन्ही देशांचे आभार मानले आहे.
🔶“ब्रिक्स लक्षात आहे का?,” असा प्रश्न विचारत या ट्विटला पोम्पिओ यांनी सुरुवात केलीय. ब्रिक्स ही ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिकेचा समावेश असणारी आंतरराष्ट्रीय स्तरावरील परिषद आहे. या ट्विटमध्ये पोम्पिओ यांनी ‘बी’ आणि ‘आय’च्या लोकांना ‘सी’ आणि ‘आर’पासून धोका आहे असं म्हटलं आहे. म्हणजेच ब्राझील आणि इंडिया म्हणजेच भारतीय नागरिकांना चीन आणि रशियापासून धोका असल्याचं पोम्पिओ म्हणाले आहेत. ट्र्म्प प्रशासनाच्या काळात भारत आणि अमेरिकेच्या संबंध कायमच मैत्रीपूर्ण राहिले. अनेकदा ट्रम्प आणि मोदी यांनी एकमेकांचे भरभरुन कौतुक केल्याचंही पहायला मिळाल.
No comments:
Post a Comment