🔶भारतीय कुशल कामगारांना जपानमध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी भारत सरकारचा जपान सरकार सोबत सहकार करार झाला आहे.
🔶कराराच्या अंतर्गत कामगारांच्या संबंधित यंत्रणेच्या योग्य संचालनासाठी भागीदारीकरिता एक मूलभूत कार्यचौकट तयार केली जात आहे.हा करार भारतामधून जपानमध्ये कुशल कामगारांच्या चळवळीला चालना देण्यास मदत करणार आहे.
🔶कराराच्या अंतर्गत आवश्यक कौशल्य व जपानी भाषेची पात्रता चाचणी यांची पूर्तता करणारे कुशल कामगार कंत्राटी आधारावर जपानमध्ये रोजगारासाठी पात्र ठरणार. जपान अश्या कामगारांना ‘विशिष्ट कुशल कामगार’ हा दर्जा प्रदान करणार.
🔶कराराच्या अंतर्गत एकूण 14 उद्योग क्षेत्रांचा समावेश करण्यात आला आहे, ज्यात परिचर्या सेवा, इमारतीची साफसफाई, सामग्री प्रक्रिया, औद्योगिक यंत्रनिर्मिती, विद्युत व इलेक्ट्रॉनिक, माहिती तंत्रज्ञान, बांधकाम, जहाज बांधणी व जहाज-संबंधित उद्योग, वाहन देखरेख, विमानचालन, लॉजिंग, कृषी, मत्स्यपालन, अन्न व पेय पदार्थांची निर्मिती आणि अन्नपदार्थ सेवा उद्योग समाविष्ट आहेत.
🔶जपान हा पूर्व आशियामधला एक द्वीप-देश आहे. जपानच्या पश्चिमेला जपानचा समुद्र, चीन, उत्तर कोरिया, दक्षिण कोरिया व रशिया, उत्तरेला ओखोत्स्कचा समुद्र व दक्षिणेला पूर्व चीन समुद्र व तैवान आहेत. टोकिओ हे देशाचे राजधानी शहर आहे आणि जपानी येन हे राष्ट्रीय चलन आहे.
🔶आशिया खंडाच्या पूर्व किनाऱ्यालगत, तैवान बेट आणि कूरील बेटे यांच्या दरम्यान लहानमोठ्या बेटाच्या तीन चंद्रकोरी मालिका तयार झाल्या आहेत.
🔶यांनाच पुष्कळ वेळा ‘तोरण बेटे’ म्हणून संबोधण्यात येते. या तोरण बेटांत चार मोठ्या व इतर 3400 बेटांचा समावेश होतो. ही सर्व बेटे मिळूनच जपान देश झाला आहे. जपानच्या अतिपूर्वेकडील स्थानामुळे जपानला “उगवत्या सूर्याचा देश” असे संबोधण्यात येते.
No comments:
Post a Comment