– जिल्हा हा प्राचीन कालखंडापासून महत्वाचा घटक मानला जातो. जिल्हा पातळीवर जिल्हाधिकाऱ्यांच्या नियंत्रणाखाली जिल्ह्याचा संपूर्ण कारभार चालतो.
– रॅम्से मॅकडोनाल्ड यांच्या मते ” जिल्हाधिकारी असे कासव आहे ज्याच्या पाठीवर भारत सरकाररूपी हत्ती उभा आहे”. जिल्हाधिकारी या पदाचा वेगवेगळ्या कालखंडामध्ये विकास होत गेला आहे.
कालखंड जिल्हाधिकाऱ्यांचे नाव
मौर्य कालखंड राजुका
गुप्त कालखंड वीसयापती
मोगल कालखंड अमीर / अमल गुजर
ब्रिटीश कालखंड जिल्हाधिकारी
भारतामध्ये जिल्हाधिकारी हे पद १४ मे १७७२ रोजी वॊरन हेस्टींगंज यांनी निर्माण केले. ( महसूल गोळा करणे, कायदा व सुव्यवस्था राखणे )
– १७८७ मध्ये लॉर्ड कॉर्नवालिस यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे न्यायदानाची वदंडाधिकाऱ्याची कामे सोपविली.
– सुरवातीला जिल्हा धिकारी होण्यासाठी ( ICS- Indian Civil Services ) परीक्षा उत्तीर्ण होणे बंधनकारक होते.
– भारतामध्ये १९४६ ला ICS सेवेचे रूपांतर IAS सेवेमध्ये करण्यात आले.
– सुरेंद्रनाथ बेनर्जी हे भारतातील पहिले ICS परीक्षा उत्तीर्ण व्यक्ती होय.
– सत्येंद्रनाथ टागोर हे भारतातील पहिले ICS अधिकारी होय.
– ICS परीक्षेमध्ये भारतीय लोकांचा सहभाग वदावा यासाठी ‘ली कमिशनच्या‘ शिफारशीच्या आधारावर भारतामध्ये १९२६ ला सांघिक लोकसेवा आयोगाची स्थापना करण्यात आली ( UPSC ).
– स्वातंत्र्यप्राप्तीनंतर सांघिक लोकसेवा आयोगाचे रूपांतर केंद्रीय लोकसेवा आयोग असे करण्यात आले व भारतीय राज्यघटनेचा कलम ३१५ मध्ये तरतूद करण्यात आली.
– जिल्हाधिकारी हा जिल्हा प्रशासनाचा सर्वोच्च प्रमुख असतो. तसेच भारतीय प्रशासन सेवेतील IAS दर्जाचा वरिष्ठ अधिकारी असतो.
– महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ मधील कलम ७ (१) नुसार प्रत्येक जिल्ह्यासाठी एक जिल्हाधिकारी असतो.
पात्रता पदवीधर असावा
निवड केंद्रीय लोकसेवा आयोगाद्वारे
नेमणूक राज्य शासन
दर्जा IAS चा
कार्यक्षेत्रे जिल्हास्तर
वेतन व भत्ते राज्य शासन
कार्यकाळ ३ वर्ष ( ३ वर्षानंतर बदली )
नियंत्रण विभागीय आयुक्त
रजा राज्य शासन
राजीनामा राज्य शासन
बडतर्फी केंद्र शासनाच्यावतीने
No comments:
Post a Comment