Friday, 1 January 2021

आजपासून काय बदलणार.


🔰नवीन धनादेश देय पद्धती : रिझव्‍‌र्ह बँकेच्या निर्देशानुसार वाणिज्यिक बँका ‘पॉझिटिव्ह पे सिस्टिम’ लागू करत आहेत. ५०,००० रुपयांवरील व्यवहारासाठी धनादेशाबरोबर संबंधितांनी खाते क्रमांक, आयएफसी कोड, खातेदाराचे नाव व संपर्क क्रमांक देणे बंधनकारक करण्यात आले आहे.


🔰सपर्करहित एटीएम कार्ड मर्यादा : ‘इन्सर्ट’नंतर ‘स्वाईप’ पद्धतीद्वारे व्यवहार करण्यासाठी एटीएम कार्डना चुंबकीय पट्टीची अनिवार्यता २०२० मध्ये अंमलात आली. सुरक्षिततेच्या दृष्टीने यापुढचे पाऊल म्हणून संपर्करहित एटीएम कार्ड संबंधित ‘पीओएस’च्या एक इंच अंतरावरून कार्यान्वित करून व्यवहार करता येणार आहे. एटीएम कार्ड तसेच यूपीआयद्वारे सध्या असलेली २,००० रुपयांची मर्यादा ५,००० रुपयांपर्यंत वाढविण्यात आली आहे.


🔰वहॉट्सअ‍ॅपचे मर्यादित भ्रमणध्वनी व्यासपीठ :अ‍ॅण्ड्रॉईडच्या ओएस ४.०.३ तसेच आय फोनच्या आयओएस ९ मंच सुसज्ज असलेल्या मोबाइलवरून व्हॉट्सअ‍ॅपची सुविधा घेता येणार नाही. तसेच निवडक संख्या असलेल्या केएआय २.५.१ तंत्रज्ञानावरील फोनवरही ही संदेश वहन यंत्रणा काम करू शकणार नाही.


🔰लण्डलाईन-मोबाइल कॉलसाठी आता शून्य : स्थिर पद्धतीच्या (लँडलाईन) दूरसंपर्क माध्यमाद्वारे भ्रमणध्वनीवर केले जाणाऱ्या कॉलसाठी आता (एसटीडीप्रमाणे) क्रमांकाआधी शून्य लावावा लागेल. यामुळे दूरसंचार क्रमांकाच्या भाऊगर्दीत सुसूत्रता येईल, असा दूरसंचार विभागाचा दावा आहे.


🔰यपीआय व्यवहार देय : यूपीआयद्वारे होणारे निधी व्यवहारांसाठी आता वाढीव किंमत मोजावी लागेल. अ‍ॅमेझॉन पे, गूगल पे, फोन पेसारख्या देय मंचावरून होणाऱ्या निधी हस्तांतरण रकमेबरोबर काही प्रमाणात शुल्क द्यावे लागेल.


🔰वाहन खरेदी महागडी : प्रवासी तसेच एसयूव्ही वाहनांच्या किंमत १ जानेवारी २०२१ पासून वाढत आहेत. विदेशी विनिमय चलनातील फरक तसेच वाहनांसाठी लागणाऱ्या सुटय़ा भागांच्या किंमती अप्रत्यक्ष करामुळे वाढल्याने वाहनांच्या एकूण किंमती ३ ते ५ टक्क्य़ांपर्यंत वाढल्या आहेत. अनेक कंपन्यांची त्यांही ही दरवाढीची मात्रा १ जानेवारीपासून लागू करत असल्याचे जाहीर केले आहे.


🔰एलपीजी सिलिंडर गॅस किंमत : स्वयंपाकासाठीच्या गॅस सिलिंडरच्या किंमती नव्या वर्षांच्या पहिल्या महिन्यापासून वाढणार आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारातील खनिज तेलाच्या किंमतीतील लक्षणीय बदलापोटी गॅस वितरक कंपन्या त्यांच्या सिलिंडरच्या किंमती सातत्याने बदलत असतात. नव्या वर्षांलाही ही परंपरा कायम राहणार आहे.

No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...