Wednesday, 6 January 2021

जगातील सर्वात मोठी लसीकरण मोहीम लवकरच - मोदी.


🗑औषध नियंत्रक संस्थेने कोव्हिशिल्ड व कोव्हॅक्सिन या दोन लशींना आपत्कालीन वापरासाठी मान्यता दिल्यानंतर आता जगातील सर्वात मोठी कोविड १९ प्रतिबंधक लसीकरण मोहीम भारतात सुरू होणार आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.


🗑या लशी भारत निर्मित असून त्यात आपले वैज्ञानिक व तंत्रज्ञ यांनी मोठी भूमिका पार पाडली, अशा शब्दात पंतप्रधानांनी प्रशंसा केली. ते म्हणाले, की जगातील सर्वात मोठा कोविड १९ लसीकरण कार्यक्रम भारतात सुरू होत असून त्यात वैज्ञानिक व तंत्रज्ञ यांच्या परिश्रमांचे मोठे योगदान आहे. भारताच्या औषध महानियंत्रकांनी सोमवारी ऑक्सफर्डची कोविड १९ लस म्हणजे सीरमची कोव्हिशिल्ड व भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन या दोन लशींना आपत्कालीन वापरासाठी मान्यता दिली आहे.


🗑राष्ट्रीय हवामानशास्त्र बैठकीत मोदी यांनी सांगितले, की भारतात तयार होणाऱ्या उत्पादनांना जगात केवळ मागणीच आहे असे नाही तर ती उत्पादने जगाने स्वीकारली आहेत. गुणवत्ता व संख्या यात गुणवत्ता जास्त महत्त्वाची असून आत्मनिर्भर भारत संकल्पनेचा पाठपुरवा करताना भारतीय उत्पादनांची गुणवत्ता वाढत आहे.

No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...