Monday, 4 January 2021

पहिली अंडरवॉटर ट्रेन


🚇 कोलकात्यात हुगळी नदीखालून धावणार देशातली पहिली अंडरवॉटर ट्रेन

 

🚇 भारतात पहिली अंडरवॉटर ट्रेन म्हणजेच पाण्याखालून जाणारी रेलगाडी लवकरच धावणार आहे. 


🚇 पश्चिम बंगालची राजधानी कोलकातामध्ये हुगळी नदीखालून ही ट्रेन धावणार आहे. 


🚇 रेल्वे लाईन टाकण्याचे काम जवळपास पूर्ण होत आले आहे.


🚇 देशातली पहिली पाण्याखालून धावणारी ट्रेन सॉल्टलेक सेक्‍टर 5 ते हावडा मैदानापर्यंत धावण्यासाठी जवळपास तयार झाली आहे. 


🚇 तसेच हा रेल्वेमार्ग दोन टप्प्यांमध्ये पूर्ण करण्यात येणार आहे. त्यातला पहिला टप्पा लवकरच प्रवाशांसाठी खुला केला जाणार. 


🚇 या ट्रेनला पाण्यापासून वाचवण्यासाठी उच्चस्तरीय सुरक्षा कवच देण्यात आले आहे.


🚇 तसेच नदीच्या मधून जाणारा हा मार्ग 520 मीटर लांब आणि 30 मीटर खोल आहे.


🚇 नदीखालून ट्रेनला हे अंतर पार करण्यासाठी 60 सेकंदाचा वेळ लागणार आहे.


🚇 या प्रकल्पासाठी हावडा ते कोलकाता दरम्यानच्या मेट्रो मार्गाला जोडणाऱ्या हुगळी नदीखाली दुहेरी बोगद्याचे बांधकाम केले गेले. 


🚇 देशातला हा पहिलाच नदीखालचा बोगदा ठरला. 


🚇 कोलकातामधील रेल्वेच्या 16.6 किमी लांबीच्या पूर्व-पश्चिम मेट्रो प्रकल्पाच्या अंतर्गत 520 मीटर लांबीचा हा बोगदा तयार करण्यात आला आहे.

No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...