Saturday, 2 January 2021

डिसेंबरमध्ये विक्रमी ‘जीएसटी’ संकलन


अप्रत्यक्ष कर संकलनाचा सलग तिसऱ्या महिन्यात एक लाख कोटी रुपयांचा टप्पा पार करणारा ‘जीएसटी’ अर्थात वस्तू व सेवा कररूपी महसूल डिसेंबर २०२० मध्ये प्रथमच १,१५,१७४ लाख कोटी रुपयांवर पोहोचला आहे.


वार्षिक तुलनेत १२ टक्क्य़ांची भर टाकणारे सरकारचे कर संकलन प्रणाली सुरू झालेल्या जुलै २०१७ कालावधीनंतर प्रथमच विक्रमी स्तरावर पोहोचले आहे. डिसेंबर २०१९ मधील १.०३ लाख कोटी रुपयांच्या तुलनेत यंदा ते वाढले आहे.


अप्रत्यक्ष कर संकलनातील वाढ व त्याचा लक्षणीय टप्पा हा करोना आणि टाळेबंदीनंतर अर्थव्यवस्था पूर्वपदावर येत असल्याचे लक्षण मानले जात आहे. नोव्हेंबर व डिसेंबर २०२० मध्ये ८७ लाख जीएसटीआर-३बी भरणा झाला आहे.


वस्तू व सेवा कर प्रणाली १ जुलै २०१७ पासून अस्तित्वात आली. २१ महिन्यात डिसेंबरमध्ये प्रथमच १.१५ लाख कोटी रुपयांचा टप्पा गाठला. यापूर्वी, एप्रिल २०१९ मध्ये १,१३,८६६ लाख कोटी रुपये असे सर्वोच्च कर संकलन झाले होते.


कर प्रणाली लागू झाल्यापासून संकलनाने एप्रिल २०२० मध्ये ३२,१७२ कोटी रुपये असा किमान महसूल मिळविला होता. टाळेबंदीचा हा परिणाम होता. तर सप्टेंबरमध्ये शिथील टाळेबंदीमुळे त्यात प्रथमच वार्षिक वाढ नोंदली गेली.


२०२० मधील लाख कोटीची परंपरा :


डिसेंबर – रु.१,१५,१७४ कोटी

नोव्हेंबर – रु.१,०४,९६३ कोटी

ऑक्टोबर – रु.१,,०५,१५५ कोटी

No comments:

Post a Comment