Tuesday 19 January 2021

बायडेन प्रशासनात भारतीय वंशाच्या २० व्यक्ती.



अमेरिकेचे नियोजित अध्यक्ष जो बायडेन यांचा शपथविधी २० जानेवारीला होत असून त्यांच्या प्रशासनात किमान २० भारतीय अमेरिकी व्यक्तींचा समावेश करण्यात आला आहे. त्यात १३ महिला आहेत. एकूण १७ जण महत्त्वाच्या पदांवर नेमले गेले आहेत.


कमला हॅरिस या प्रथमच देशाच्या पहिल्या महिला उपाध्यक्ष म्हणून शपथ घेणार आहेत. हॅरीस (वय ५६) या पहिल्या भारतीय वंशाच्या तसेच आफ्रिकन अमेरिकन उपाध्यक्ष आहेत. इतर प्रमुख व्यक्तींमध्ये व्हाइट हाऊस कार्यालयातील अर्थसंकल्प  संचालक नीरा टंडन, अमेरिकेचे महाशल्यचिकित्सक डॉ. विवेक मूर्ती, न्याय खात्यातील सहायक महाधिवक्ता वनीता गुप्ता, नागरी सुरक्षा व मानवी हक्क खात्यातील उझरा झेया यांचा समावेश आहे.


माला अडिगा यांची प्रथम महिला डॉ. जिल बायडेन यांच्या सचिवपदी नेमणूक करण्यात आली आहे. गरिमा वर्मा यांची जिल यांच्या डिजिटल संचालक म्हणून नेमणूक केली आहे, तर सब्रिना सिंह यांना उप प्रसिद्धी सचिव नेमण्यात आले आहे. पहिल्यांदाच भारतीय अमेरिकी व्यक्तींपैकी काश्मिरी आयशा शहा यांची व्हाइट हाऊसमध्ये नेमणूक झाली आहे, तर समीरा फाझिली यांना  राष्ट्रीय अर्थ मंडळात उपसंचालक पद मिळाले आहे.


भारत राममूर्ती यांनाही उपसंचालकपद मिळाले आहे. गौतम राघवन यांची अध्यक्षीय कोर्यालयात उपसंचालकपदी नियुक्ती झाली आहे. विनय रेड्डी, वेदांत पटेल, तरुण छाब्रिया, सुमोना गुहा, शांथी कलाथिल, सोनिया अग्रवाल विदुर शर्मा,नेहा गुप्ता, रीमा शहा यांच्याही नेमणुका झाल्या आहेत.

No comments:

Post a Comment

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...