Sunday, 31 January 2021

खाडी

🟢 नदी जेथे समुद्राला जाऊन मिळते, तेथील पाण्याच्या साठ्याला खाडी असे म्हणतात. 


🟢 भरतीचे पाणी नदीच्या मुखामध्ये जिथपर्यंत येते त्या भागास “खाडी”असे म्हणतात. कोकणचा किनारा अनेक खाड्यांनी बनलेला आहे.


▪️कधीकधी किनाऱ्याचा सखल भूभाग खचून किंवा समुद्राच्या पाण्याची पातळी वाढल्यानेसुद्धा समुद्री खाडी तयार होते. 


▪️खाडी जर बऱ्यापैकी मोठी असेल तर तिला आखात म्हणतात.


▪️बगालचा उपसागर हा देखील एका अखाताचाच प्रकार आहे.


▪️महाराष्ट्राच्या पश्चिम समुद्रकिनाऱ्याला अशा अनेक खाड्या आहेत. तिथली बहुतेक बंदरे खाडीच्या आश्रयाने बनली आहेत.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖


🛑 खाड्यांचा उत्तरेकडून दक्षिणेकडील क्रम खालीलप्रमाणे आहे.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖


१) डहाणूची खाडी, जि. ठाणे


२) दातीवऱ्याची खाडी, जि. ठाणे


३) वसईची खाडी, जि. ठाणे


४) धरमतरची खाडी, जि. रायगड


५) रोह्याची खाडी, जि. रायगड


६) राजापुरीची खाडी, जि. रत्नागिरी


७) बाणकोटची खाडी, जि. रत्नागिरी


८) दाभोळची खाडी, जि. रत्नागिरी


९) जयगड, जि. रत्नागिरी


१०)विजयदुर्ग, जि. सिंधुदूर्ग


११)तेरेखोलची खाडी, सिंधुदूर्ग


No comments:

Post a Comment