स्त्री शिक्षणाचा पाया रचणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची आज जयंती. 💐💐
🔰साताऱ्यातील नायगाव येथे खंडोजी नेवासे आणि लक्ष्मीबाई यांच्या पोटी आजच्याच दिवशी सावित्रीबाईंचा जन्म 3 जानेवारी 1831 मध्ये झाला. क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले यांच्यासोबत वयाच्या अवघ्या नवव्या वर्षी त्यांचा विवाह झाला.
🔰जोतिबा फुले एक थोर व्यक्तिमत्व होते. लग्नापूर्वी काहीही न शिकलेल्या सावित्रीबाईंनी लग्नानंतर एका वर्षातच जोतिबांच्या प्रेरणेने शिक्षणास सुरुवात केली.
🔰 महिलांच्या शिक्षणासाठी आणि समाजासाठी आयुष्यभर झगडलेल्या सावित्रीबाईंच्या विशेष कार्याविषयी जाणून घेऊया...
🔰सावित्रीबाई या भारतातील पहिल्या महिला शिक्षिका आणि मुख्याध्यापिका असून, त्या महिला मुक्ती आंदोलनाच्या नेत्या होत्या.
🔰 सावित्रीबाईंनी आपले पती जोतिबा फुले यांच्या सोबतीने मुलींसाठी 18 शाळा सुरू केल्या. त्यातील पहिली शाळा त्यांनी पुण्यात सुरू केली होती.
🔰28 जानेवारी 1853 मध्ये गर्भवती बलात्कार पीडित महिलांसाठी बाल हत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना केली.
🔰सावित्रीबाईंनी 19 व्या शतकात सतीप्रथा, बालविवाह या अनिष्ट प्रथांविरूद्ध बंड पुकारले.
🔰विधवांसाठी एका केंद्राची स्थापना करून त्यांना पुनर्विवाहासाठी प्रोत्साहित करण्याचे काम केले.
🔰 सावित्रीबाई फुले यांनी आत्महत्या करणाऱ्या विधवा ब्राह्मण महिला काशीबाईंची आपल्या घरामध्ये प्रसुती करून त्यांचा मुलगा यशवंतचा आपला दत्तक पुत्र म्हणून सांभाळ केला. पुढे जाऊन यशवंत शिक्षण घेऊन डॉक्टर झाला.
🔰महात्मा जोतिबा फुले यांच्या मृत्यूनंतर सावित्रीबाईंनी त्यांचे अर्धवट राहिलेलं समाजकार्य पूर्ण करण्याचा निर्धार केला.
🔰10 मार्च 1897 रोजी प्लेगच्या रूग्णांची सेवा करताना सावित्रीबाईंचा मृत्यू झाला.
🔰 सावित्रीबाईंनी आपले संपूर्ण जीवन महिला आणि दलितांना त्यांचे अधिकार मिळवून देण्यासाठी वेचले. त्यांना विनम्र अभिवादन!
No comments:
Post a Comment