Sunday, 3 January 2021

'फिक्की' अध्यक्षपदी उदय शंकर यांची निवड


• माध्यम क्षेत्रातील उद्योजक उदय शंकर यांची  २०२० - २१ सालासाठी 'फिक्की' चे अध्यक्ष म्हणून नियुक्ती झाली आहे.


• वॉल्ट डिस्ने कंपनीचे आशिया पॅसिफिक विभागाचे अध्यक्ष, स्टार आणि डिस्ने इंडिया या वाहिन्यांचे प्रमुख असलेले उदय शंकर यांनी अपोलो हॉस्पिटल्स समूहाच्या संगीता रेड्डी यांच्याकडून या अध्यक्षपदाची सूत्रे घेतली.


• त्यांच्यासह हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेडचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजीव मेहता हे 'फिक्की' चे वरिष्ठ उपाध्यक्ष म्हणून कामकाज पाहतील.


• इंडियन मेटल्स अँड फेरो अलॉयज लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक शुभ्रकांत पांडा हे चेंबरचे उपाध्यक्ष असतील.


■ काय आहे फिक्की ■


• फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स ॲंड इंडस्ट्रीज (फिक्की) ( Federation of Indian Chambers of Commerce and Industry (FICCI)) ही भारतातील विविध उद्योगांचे, त्यांच्या हितसंबंधांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या विविध संघटनांची शिखर संस्था आहे. 


• ही भारतातील सर्वात मोठी आणि सर्वात जुनी व्यापार उदीम संघटना आहे. 


• घनश्याम दास बिर्ला आणि पुरुषोत्तम ठक्कर यांनी महात्मा गांधी यांच्या सल्ल्यावर 1927 मध्ये याची स्थापना केली होती. 

 

• या संस्थेचे मुख्यालय नवी दिल्ली येथे आहे.

No comments:

Post a Comment

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...