Monday, 11 January 2021

भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी जम्मू व काश्मिर सरकारचे ‘सतर्क नागरिक’ अ‍ॅप


जम्मू व काश्मिर केंद्रशासित प्रदेशाचे उपराज्यपाल मनोज सिन्हा यांच्या हस्ते ‘सतर्क नागरिक’ नामक एका मोबाईल अ‍ॅपचे अनावरण करण्यात आले.


भ्रष्टाचाराला आळा घालणे हे या अॅपचे उद्दीष्ट असून त्याच्या माध्यमातून नागरिकांच्या तक्रारी नोंदविण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.


राज्य सरकारचे दक्षता अधिकारी विभाग या अॅपचे व्यवस्थापन बघणार आहे.


जम्मू व काश्मिर विषयी


जम्मू व काश्मिर हा भारताचा उत्तरेकडील एक भूप्रदेश आहे. 


भारतीय संसदेनी मंजूर केलेल्या ठरावानुसार केंद्र सरकारने भारतीय संविधानाचे कलम 370 रद्द केल्यानंतर 31 ऑक्टोबर 2019 पासून या प्रदेशाला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा देण्यात आला आहे. जम्मू व काश्मिर केंद्रशासित प्रदेशात 20 जिल्हे आहेत.

No comments:

Post a Comment