Tuesday, 5 January 2021

वर्षाच्या पहिल्याच दिवशी देशात ६०,००० बालकांचा जन्म, सर्वाधिक बालकांचा जन्म झालेल्या देशांमध्ये भारत अव्वल



भारतामध्ये नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी जवळजवळ ६० हजार बालकांचा जन्म झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. विशेष म्हणजे वर्षाच्या पहिल्या दिवशी सर्वाधिक बालकांचा जन्म होण्याच्या यादीमध्ये भारत अव्वल राहील असा अंदाज अधिक व्यक्त करण्यात आला होता. मुलांसंदर्भातील विषयांवर जगभरामध्ये काम करणाऱ्या युनिसेफ (युनायटेड नेशन्स इंटरनॅशनल चिल्ड्रन इमर्जन्सी फंड) या संस्थेने भारतामध्ये पहिल्याच दिवशी ६० हजार बालकांचा जन्म होईल असं म्हटलं होतं. 


तसेच जगभरामध्ये ३ लाख ७० हजार बालकांचा १ जानेवारी २०२१ रोजी जन्म होईल असंही युनिसेफने म्हटलेलं. मात्र यंदा भरतात वर्षाच्या पहिल्याच दिवशी जन्माला येणाऱ्या बालकांचे प्रमाण हे मागील वर्षीपेक्षा कमी आहे. मागील वर्षी म्हणजे १ जानेवारी २०२० रोजी भारतात ६७ हजाराहून अधिक बालकांचा जन्म झाला होता.


नवीन वर्षाच्या आगमानाआधीच १ जानेवारी रोजी सर्वाधिक बालकांचा जन्म कोणत्या देशांमध्ये होईल यासंदर्भातील अंदाज व्यक्त करण्यात आला होता. त्यानुसार भारतात ५९ हजार ९९५ बालकांचा जन्म होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला. त्याचबरोबर चीन ३५ हजार ६१५, नायझेरिया २१ हजार ४३९, पाकिस्तान १४ हजार १६१, इंडोनेशिया १२ हजार ३३६, इथियोपिया १२ हजार ६, अमेरिका १० हजार ३१२, इजिप्त नऊ हजार ४५५, बांगलादेश नऊ हजार २३६ आणि डेमोक्रेटीक रिपब्लिक ऑफ काँगो आठ हजार ६४० बालकांचा जन्म होईल असं सांगण्यात आलं होतं. 


जगभरामध्ये १ जानेवारी जन्माला येणाऱ्या बालकांपैकी ५२ टक्के बालकं या दहा देशांमध्ये जन्माला येतील असं युनिसेफनं म्हटलं आहे.

यंदाच्या वर्षी जन्माला येणाऱ्या १४ कोटी बालकांचे सरासरी वयोमान हे ८४ वर्ष असेल असंही युनिसेफने म्हटलं आहे. भारतामधील बालकांचे सरासरी वयोमान हे ८० वर्षे ९ महिने इतकं असेल असंही यात नमूद करण्यात आलं आहे. तुलनात्मकरित्या सांगायचं झाल्यास यंदाच्या वर्षी जन्माला येणाऱ्या बलाकांची संख्या ही २०२० मध्ये करोनामुळे मृत्यू पावलेल्यांच्या संख्येपेक्षा ७८ पटींनी जास्त असणार आहे.

No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...