अमेरिकेच्या पाठोपाठ आता ‘ओपन स्कायज' संधी (मुक्त आकाश करार) या आंतरराष्ट्रीय करारामधून माघार घेणार असल्याची घोषणा रशियाने केली. 2002 साली अंमलात आलेल्या या कराराचे विघटन करण्यास रशियाने नकार दिला
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नोव्हेंबर 2020 या महिन्यात या करारातून माघार घेतली
‘ओपन स्कायज' संधी विषयी 👇
रशिया आणि पश्चिम यांच्यात विश्वास वाढवणे हा या करारामागचा उद्देश होता.
करारानुसार, सदस्यांना एकमेकांच्या प्रदेशात विमानांद्वारे नि:शस्त्र पाळत ठेवली जाते आणि शस्त्रास्त्रांच्या विकासावर लक्ष ठेवण्यास परवानगी मिळते. सदस्य राष्ट्र संमतीने दुसऱ्याच्या कोणत्याही भागावर पाळत ठेवू शकते
सैनिकी सुविधांवर निरिक्षण ठेवणे तसेच लष्कराच्या सैन्याने सैन्य दलाची कामे व त्याविषयीची माहिती गोळा करण्यासाठी या कराराच्या सदस्य राष्ट्रांना परस्परांच्या जागेवरून उड्डाणे करण्यास परवानगी दिली गेली आहे.
सोव्हिएत संघाच्या विभाजनानंतर NATO समूहाचे सदस्य आणि माजी वारसाव करारातले देश यांच्यात हा करार झाला आहे. यात 34 सदस्य देश समाविष्ट आहेत
भारत या कराराचा सदस्य नाही.
No comments:
Post a Comment